scorecardresearch

१ वर्षाने बनलेल्या विपरीत राजयोगाने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? शनिदेव देणार मान, प्रतिष्ठा व प्रचंड धनलाभाची संधी

Shani Dev Uday 2023: शनीच्या आशीर्वादाने येत्या फेब्रुवारीपासून ३ राशींना प्रचंड धनलाभाची व प्रगतीची संधी मिळू शकते.

१ वर्षाने बनलेल्या विपरीत राजयोगाने ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? शनिदेव देणार मान, प्रतिष्ठा व प्रचंड धनलाभाची संधी
१ वर्षाने बनलेल्या विपरीत राजयोगाने 'या' ३ राशी होणार श्रीमंत? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shani Dev Uday 2023: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर दिसून येतो. २०२३ हे वर्ष शनिदेवाच्या सर्वात मोठ्या बदलांचे असणार आहे. १७ जानेवारीला शनि ३० वर्षांनी स्वतःच्या कुंभ राशीत व स्वतःच्या मूळ शतभिषा नक्षत्रात सुद्धा प्रवेश करणार आहे. यामुळे तब्बल १ वर्षाने शनिदेवाचा उदय होणार आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच शनिदेव उदय होतील व त्यामुळे सर्वच राशींच्या कुंडलीत मोठे बदल होऊ शकतात. ज्योतिषीय अभ्यासकांच्या माहितीनुसार. शनीच्या आशीर्वादाने येत्या फेब्रुवारीपासून ३ राशींना प्रचंड धनलाभाची व प्रगतीची संधी मिळू शकते. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे आपण जाणून घेऊयात..

तूळ (Tula Zodiac)

शनिचा उदय होताच तूळ राशीसाठी शुभ काळ सुरु होऊ शकतो. शनिदेव आपल्या राशीच्या पंचम स्थानी उदयोन्मुख आहेत. हे स्थान संततीप्राप्ती, शिक्षण व प्रेम विवाहाशी संबंधित आहे. या काळात आपण नवीन व्यवसाय सुरु करू शकता ज्यातून दीर्घकाळासाठी प्रचंड धनलाभाची संधी आहे. तुम्हाला मुलांकडून शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये लाभ होण्याचे पूर्ण योग आहेत. जोडीदाराचे मन सांभाळून ठेवण्याची काळजी घ्यावी लागेल.

वृषभ (Taurus Zodiac)

शनिदेव आपल्या राशीला करिअर व व्यवसायात मोठा फायदा मिळवून देण्याची शक्यता आहे. शनिदेव आपल्या राशीच्या १० व्या प्रभावकक्षेत स्थिर असल्याने आपल्याला कार्यस्थळी मोठा धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपल्याला नवीन बदल घडवण्याची संधी आहे ज्यामुळे आपण सर्वांच्या कौतुकास पात्र ठरू शकाल. ज्युनिअर मंडळींची साथ लाभू शकते. तुम्हाला पेट्रोल, तेल, लोखंड या क्षेत्रातून लाभ होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा<< १३ मार्च २०२३ पर्यंत ‘या’ ३ राशींना होणार बक्कळ धनलाभ? मंगळ व लक्ष्मी कृपेने तुम्हीही होऊ शकता प्रचंड श्रीमंत

वृश्चिक (Scorpio Zodiac)

शनिदेव आपल्या राशीच्या प्रभावकक्षेत चौथ्या स्थानी स्थिर होणार आहे. हे स्थान कौटुंबिक सुखाचे मानले जाते. येत्या काळात आईची साथ लाभू शकते. तुमच्या नशिबात भौतिक सुखाचे योग आहेत. आर्थिक दृष्टीने आपल्याला मोठा लाभ होऊ शकतो. रिअल इस्टेट व जमिनीच्या व्यापारातून तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. येत्या काळात विवाहयोग्य तरुणांना लग्नासाठी स्थळ येऊ शकते. तुमच्या बहुतांश अपेक्षा पूर्ण करणारा योग्य जोडीदार आयुष्यात येण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-01-2023 at 12:25 IST

संबंधित बातम्या