Shani planet will transit in kumbh 2023 these zodiac signs can get more money gps 97 | Loksatta

तब्बल ३० वर्षानंतर शनिदेवाचा स्वतःच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत प्रवेश; ‘या’ ३ राशीच्या लोकांना अमाप पैसा मिळण्याची संधी

Shani Dev Gochar In Aquarius 2022: वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शनिदेव १७ जानेवारीला कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनीच्या या संक्रमणामुळे ३ राशीच्या लोकांना चांगला पैसा मिळू शकतो.

तब्बल ३० वर्षानंतर शनिदेवाचा स्वतःच्या मूळ त्रिकोण कुंभ राशीत प्रवेश; ‘या’ ३ राशीच्या लोकांना अमाप पैसा मिळण्याची संधी
फोटो: संग्रहित

Shani Transit In Kumbh: शनिदेव सर्व ग्रहांमध्ये सर्वात कमी वेगाने प्रवास करतात. यासोबतच शनिदेवाला मकर आणि कुंभ राशीचा स्वामी मानले जाते. म्हणजे या राशींवर शनिदेवाचे वर्चस्व असते. आम्ही तुम्हाला सांगतो की, शनिदेव नोव्हेंबरमध्ये मकर राशीत प्रवेश करत होते आणि आता ते १७ जानेवारी २०२२ रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल. परंतु अशा ३ राशी आहेत, ज्यांना यावेळी चांगला लाभ होईल. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी…

मिथुन राशी

शनिदेवाचे राशी परिवर्तन तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून नवव्या भावात प्रवेश करणार आहेत. जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी नशीब तुमच्या सोबत असेल. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. यासोबतच आर्थिक लाभही होईल. विद्यार्थ्यांना प्रगती करता येईल. त्याचबरोबर तुमच्यावर अडकलेली कामेही करता येतील.

( हे ही वाचा: २०२३ मध्ये ‘या’ ३ राशींचे नशीब बदलणार? केतूच्या आशीर्वादाने होईल प्रचंड धनलाभ)

सिंह राशी

शनिदेवाचे संक्रमण तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. कारण शनि सप्तम आणि आठव्या भावाचा कारक असल्यामुळे सप्तम भावात संचार करेल. जे वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे अर्थ मानले जाते. त्यामुळे या काळात तुम्हाला भागीदारीच्या कामात चांगले यश मिळू शकते. त्याचबरोबर वैवाहिक जीवनात गोडवा दिसून येईल. नोकरदारांसाठी हे वर्ष वरदानापेक्षा कमी नसेल. कारण शनिदेव तुमच्या नवव्या भावात आहेत.

तूळ राशी

शनिदेवाचे संक्रमण तूळ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण शनिदेव तुमच्या राशीतून पाचव्या भावात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे यावेळी तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकतो. यावेळी सामाजिक प्रतिष्ठा वाढण्याची चिन्हे आहेत. त्याच वेळी, आपण यावेळी पैसे वाचवू शकता.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 18:19 IST
Next Story
२०२३ मध्ये ‘या’ ३ राशींचे नशीब बदलणार? केतूच्या आशीर्वादाने होईल प्रचंड धनलाभ