Shani Meen Rashi Gochar 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहील.

२०२७ मध्ये शनीचे राशी परिवर्तन साडेसातीचे गणित बदलणार आहे. ३ जून रोजी शनीचा मेष राशीत प्रवेश झाल्यानंतर वृषभ राशीच्या व्यक्तींवर साडेसाती सुरू होईल. मेष राशीच्या व्यक्तींसाठी साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल, तर मीन राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा अंतिम टप्पा असेल. कुंभ राशीच्या व्यक्तींनाही साडेसातीपासून मुक्ती मिळेल. तसेच २० ऑक्टोबर रोजी शनी वक्री होऊन पुन्हा मीन राशीत परततील. त्यानंतर या राशींच्या साडेसातीची स्थिती पुन्हा बदलेल.

शनीचे गोचर भाग्य बदलणार

वृषभ

शनीचा मेष राशीत प्रवेश होताच वृषभ राशीच्या व्यक्तींवर साडेसाती सुरू होईल. हा साडेसातीचा पहिला टप्पा असेल. मात्र, ही स्थिती ऑक्टोबरपर्यंतच कायम राहील. २० ऑक्टोबर रोजी शनी पुन्हा मीन राशीत परतल्यावर वृषभ राशीच्या व्यक्तींना तूर्तास दिलासा मिळेल. फेब्रुवारी २०२८ मध्ये शनी पुन्हा मेष राशीत प्रवेश केल्यानंतर साडेसातीला सुरुवात होईल.

मेष

मेष राशीच्या व्यक्तींवर सध्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. ३ जून २०२७ रोजी शनीचा मेष राशीत प्रवेश होताच साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. ऑक्टोबरमध्ये शनी पुन्हा मीन राशीत परतल्यावर मेष राशीवर साडेसातीचा पहिला टप्पा पुन्हा प्रभावी होईल.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींसाठीही हे गोचर महत्त्वाचे ठरणार आहे. शनी मेष राशीत प्रवेश केल्यानंतर मीन राशीच्या व्यक्तींवर साडेसातीचा अंतिम टप्पा सुरू होईल. मात्र, ऑक्टोबरमध्ये शनी पुन्हा मीन राशीत परतताच साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी ३ जून २०२७ हा दिवस दिलासा देणारा ठरू शकतो. शनीचा मेष राशीत प्रवेश होताच कुंभ राशीवरील साडेसाती संपेल. मात्र, २० ऑक्टोबर रोजी शनी पुन्हा मीन राशीत परतल्यावर कुंभ राशीवर साडेसाती पुन्हा सुरू होईल. फेब्रुवारी २०२८ मध्ये शनी पुन्हा मेष राशीत प्रवेश केल्यानंतर कुंभ राशीच्या व्यक्तींना पुन्हा दिलासा मिळेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)