Shani Sadesati Zodiac Signs: नवीन वर्ष सुरू होण्यासाठी आता दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधी उरला आहे. त्यामुळे येणारं वर्ष आपल्यासाठी कसं असेल, हे जाणून घेण्याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. विशेष म्हणजे, ज्या लोकांची शनीची साडेसाती संपणार आहे, त्यांच्यासाठी २०२७ हे वर्ष खूप खास ठरणार आहे. मात्र ज्या राशींवर शनीची साडेसाती सुरू होणार आहे, त्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पंचांगानुसार, ३ जून २०२७ रोजी शनीदेव मेष राशीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हे गोचर कोणत्या राशीसाठी शुभ ठरणार आहे आणि कोणत्या राशींनी सावध राहावं, ते जाणून घेऊया.

२०२७ मध्ये कुंभ राशीला शनीच्या साडेसातीतून मिळणार सुटका

३ जून २०२७ रोजी कुंभ राशीच्या लोकांची शनीच्या साडेसातीतून सुटका होणार आहे. त्यामुळे त्यांना मोठा फायदा होऊ शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अडचणी दूर होतील. रखडलेली कामे वेगाने पूर्ण होतील. पैशाचे नवीन मार्ग खुले होतील. नोकरी आणि व्यवसायात केलेल्या मेहनतीचं चांगलं फळ मिळू लागेल. आर्थिक स्थितीही सुधारेल.

२०२७ मध्ये वृषभ राशीवर सुरू होणार शनीची साडेसाती

२०२७ मध्ये वृषभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू होईल. त्यामुळे खर्च वाढू शकतो. आर्थिक ताण जाणवू शकतो. झोप न लागण्यासारख्या समस्या त्रास देऊ शकतात. घाईघाईत घेतलेला कोणताही निर्णय नुकसानकारक ठरू शकतो. व्यवसायातही नुकसान होण्याची शक्यता आहे.

या राशींवरही राहील शनीची साडेसाती

२०२७ मध्ये वृषभ राशीसोबतच मेष आणि मीन राशीवरही शनीची साडेसाती राहणार आहे. ३ जून २०२७ पासून मेष राशीवर साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू होईल. तर मीन राशीवर साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होईल. त्यामुळे या राशीच्या लोकांनीही सावध राहणं गरजेचं आहे.

या राशींवर राहील शनीची ढैय्या

२०२७ मध्ये कन्या आणि मकर राशीवर शनीची ढैय्या सुरू होईल. त्यामुळे या राशीच्या लोकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागू शकतो. अचानक खर्च वाढू शकतो. तसेच बोलताना कठोर किंवा कटू शब्द निघण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्यातिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)