Shani Sadesati 2026: २०२६चं नवीन वर्ष येत आहे. नवीन वर्ष म्हणजे नवीन उमेद आणि नवीन उत्साह. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपले भविष्य जाणून घ्यायचे असते. तसेच आपल्या राशीवर शनीची साडेसाती किंवा ढैय्या आहे का, हेही जाणून घ्यायची इच्छा असते. साडेसातीला मोठी पनवती आणि ढैय्याला छोटी पनवती असे मानले जाते. गेल्या वर्षाप्रमाणे २०२६ मध्येही शनी मीन राशीतच राहणार आहे.
शनीची साडेसाती कोणावर? (Shani Sadesati on Which Rashi)
कुंभ राशी- साडेसातीचा शेवटचा टप्पा
शनीचा प्रभाव
- मनावर ताण
- कामाच्या ठिकाणी कामे उशिरा होणे
- कुटुंबात तणाव
- आरोग्यावर परिणाम
उपाय
- हनुमान चालीसा म्हणणे
- शनी अमावस्येला तेल दान करणे
- शनिवारी काळे तीळ दान करणे
मीन राशी – साडेसातीचा मधला (सर्वात कठीण) टप्पा
प्रभाव
- करिअरमध्ये कठीण निर्णय घ्यावे लागणे
- पैशांचे नुकसान होण्याची शक्यता
- शत्रू वाढणे
- नात्यांत तणाव किंवा दुरावा
उपाय
- शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे
- शनी स्तोत्र पठण करणे
- गरीबांना काळे कपडे आणि धान्य दान करणे
मेष राशी – साडेसातीचा सुरुवातीचा टप्पा
प्रभाव
- नोकरीत बदल
- घरात भांडण-तणाव
- आरोग्यात चढ-उतार
उपाय
- हनुमानजीची उपासना करणे
- शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे
- काळ्या कुत्र्याला आणि गायीला पोळी देणे
२०२६ मधील ढैय्या (अडीचकी किंव पनवती) प्रभाव
सिंह राशी – शनीचा अष्टम गोचर (अष्टम ढैय्या)
प्रभाव
- अनावश्यक खर्च
- प्रवासात त्रास
- आरोग्यावर परिणाम
उपाय
- “ॐ शं शनैश्चराय नमः” जप करणे
- शनिवारी उडीद दान करणे
धनु राशी – शनीचा चतुर्थ गोचर (चौथी ढैय्या)
प्रभाव
- घरात भांडण-तणाव
- स्थिर मालमत्तेत अडथळे
- मनात बेचैनी
उपाय
- काळ्या घोड्याची नाल धारण करणे
- निळा कपडा दान करणे
- हनुमान मंदिरात दर्शन घेणे
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
