scorecardresearch

मिथुन राशीसाठी २०२३ वर्ष कसे जाणार? शनि साडेसातीतून मुक्ती मिळताच प्रचंड धनलाभाची संधी

मिथुन राशीच्या लोकांसाठी २०२३ वर्ष कसे जाणार? जाणून घ्या व्यवसाय, आरोग्य आणि वैवाहिक जीवनाची स्थिती

Gemini Zodiac sign 2023 Yearly Horoscope
मिथुन राशीसाठी २०२३ वर्ष कसे जाणार? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mithun Zodiac In 2023 Yearly Horoscope: ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या ग्रहांचा राजकुमार बुध आहे. बुध हा ज्योतिषशास्त्रात बुद्धिमत्ता, व्यवसाय, तर्कशक्ती आणि ज्ञानाचा कारक मानला जातो. त्यानुसार येत्या २०२३ या नवीन वर्षात तुम्हाला शनिच्या ढैय्यातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. १७ जानेवारीला मकर राशीत गोचर करताच मिथुन राशीच्या लोकांना ढैय्यापासून मुक्ती मिळू शकते.

तुम्ही १ जानेवारी २०२३ च्या गोचर कुंडलीतील ग्रहांची स्थिती पाहिली तर केतू तुमच्या पाचव्या स्थानी असणार आहे. तर सातव्या स्थानी सूर्य आणि बुधाच्या संयोगाने, बुधादित्य राजयो होईल. आठव्या स्थानी शनी आणि शुक्राचा संयोग होईल आणि गुरु दहाव्या स्थानी स्थिर असणार आहे. ११ व्या स्थानी चंद्र आणि राहू आहेत. त्यामुळे १७ जानेवारीला शनि नवव्या स्थानी प्रवेश करणार असून एप्रिलमध्ये गुरु ग्रह अकराव्या स्थानी प्रवेश करणार आहे. वरील प्रमाणे ग्रहांची स्थिती असणार आहे. तर आता २०२३ हे नववर्ष मिथुन राशीच्या लोकांच्या करिअर, व्यवसाय आणि कौटुंबिक जीवनासाठी कसे असणार आहे ते जाणून घेऊयात..

मिथुन राशीच्या लोकांचे व्यवसाय आणि शिक्षण (Career Of Mithun Zodiac In 2023)

२०२३ हे वर्ष स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनुकूल ठरू शकते. कुंडलीत गुरु आणि बुध केंद्रस्थानी विराजमान आहेत आणि राहू लाभदायक स्थितीत आहेलक्ष विचलित होण्याची शक्यता असली तरी शिक्षणात अडथळा येण्याची शक्यता नाही. उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण होतील, शिवाय गुरूची स्थिती वर्षभर चांगली असल्यामुळे ज्यांना परदेशात शिक्षण घ्यायचे त्यांच्यासाठी संधी उपलब्ध तयार होऊ शकतात.

आणखी वाचा – Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष

२०२३ मध्ये मिथुन राशीतील वैवाहिक जीवन आणि नातेसंबंध – (Married Life And Relationship Of Mithun Zodiac In 2023)

२०२३ च्या एप्रिलनंतर तुमच्या मुलांची लग्न होण्याची शक्यता आहे. शिवाय तुम्ही स्वतः अविवाहित असाल तर तुमच्या लग्नाचा योगही या नवीन वर्षामध्ये आहे. तसंच ज्यांचे लग्न झाले आहे त्यांना एप्रिल महिन्यानंतर संतती प्राप्तीची शक्यता आहे. ज्यांची लग्न झाली आहेत त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये गोडवा राहिल.

मिथुन राशीतील लोकांच्या व्यवसायाची स्थिती- (Busniess Of Mithun Zodiac In 2023)

२०२३ हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांच्या काम आणि व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल ठरू शकते. कारण शनिचा ढैय्या संपणार आहे त्यामुळे तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. तसंच १७ जानेवारीनंतर तुम्ही नोकरी बदलू शकता. ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल ते देखील व्यवसाय सुरु करू शकतात. यासह नोकरदारांना या वर्षी बढती मिळू शकते. नवीन वर्षामध्ये कोणत्यागही क्षेत्रात कसलीही संधी मिळाली तर ती हातची जाऊ देऊ नका.

हेही वाचा – ३० वर्षांनी शनिचा कुंभ राशीत प्रवेश, गुरुदेवही प्रसन्न! २०२३ मध्ये तुम्हीही होणार श्रीमंत? प्रेम व आरोग्य कसे असेल?

२०२३ मधील आर्थिक स्थिती –

आर्थिक स्थितीच्या दृष्टीने हे वर्ष तुमच्यासाठी अद्भूत ठरू शकते. कारण राहु ग्रह लाभदायक स्थानी आहे. शिवाय २२ एप्रिलनंतर गुरुही लाभदायक स्थानी येईल. त्यामुळे जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. यासोबतच शनिदेव भाग्यस्थानी येणार असल्यामुळे नशिबात वाढ होऊ शकते ज्यामुळे आपोआप कामात प्रगती होण्याची शक्यता आहे. या वर्षात तुम्ही वाहने आणि घरे खरेदी करू शकता. त्याचबरोबर पैशांची बचतही करु शकता.

मिथुन राशीच्या लोकांचे आरोग्य –

२०२३ हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगले ठरू शकते. शनिची ढैय्या दूर होताच तुम्हाला रोग, ऋण आणि शत्रूपासून मुक्ती मिळू शकते. या वर्षी तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्या जाणवण्याचे योग नाहीत. पण तुमच्या कुंडलीत शनिदेव आठव्या स्थानात राहणार आहे. तर मंगळ १२ व्या स्थानी प्रवेश करेल, त्यामुळे या वर्षात तुम्हाला वाहन चालवताना काळजी घ्यावी लागणार आहे. तसंच या वर्षात तुम्हाला गॅसची समस्या, गुडघ्याचा आणि प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे. विशेषत: ज्या लोकांवर राहू आणि शनीची महादशा सुरू त्यांना हा त्रास जाणवू शकतो.

हेही वाचा- १ जानेवारीपासून कर्क राशीत शनिदेव घडवणार सर्वात मोठे बदल? २०२३ मध्ये आर्थिक स्थिती, प्रेम, आरोग्य कसे असणार?

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-12-2022 at 13:21 IST
ताज्या बातम्या