Shani Sadesati Zodiac Signs: दंड देणारे शनीदेव आता अस्त होणार आहेत. सूर्य मीन राशीत प्रवेश करताच शनीची ताकद कमी होईल. त्यामुळे त्याच्या वाईट परिणामांमध्येही घट होईल. विशेषतः शनी अस्त झाल्यामुळे सध्या ज्यांच्यावर साडेसाती चालू आहे, अशा दोन राशींना याचा फायदा होईल.
शनी अस्त झाल्यामुळे राशींवर होणारा शुभ परिणाम
द्रिक पंचांगानुसार १३ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी शनी अस्त होणार आहेत. शनी मीन राशीत अस्त होत आहेत. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. पण त्यातील ३ राशींवर शनी अस्त होण्याचा चांगला परिणाम होईल. त्या राशी आहेत – मेष, कुंभ आणि वृश्चिक.
यापैकी मेष आणि कुंभ राशींवर सध्या शनीची साडेसाती चालू आहे. १३ मार्च २०२६ नंतर त्यांच्या आयुष्यात कसे बदल होतील, हे जाणून घेऊया. तसेच शनी २२ एप्रिल २०२६ रोजी पुन्हा उदयास येतील.
मेष राशी (Aries Horoscope)
मेष राशीवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे आणि शनी अस्त झाल्यामुळे या राशीच्या लोकांना मोठा दिलासा मिळेल. साडेसातीच्या कठीण परिणामांपासून थोडी सुटका होईल. खर्च कमी होतील, त्यामुळे बचत करता येईल. एखादी जुनी इच्छा पूर्ण होऊ शकते. परदेशातून पैसा मिळू शकतो. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होऊ शकते.
वृश्चिक राशी (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठीही शनी अस्त होणे फायदेशीर ठरू शकते. त्यांचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल, त्यामुळे ते मोठे निर्णय घेऊ शकतील. अडकलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगती होईल. पदोन्नती आणि पगारवाढ होण्याची शक्यता आहे. तसेच व्यावसायिक लोकांची मोठी डील फायनल होऊ शकते. मात्र संततीबाबत काही अडचण येऊ शकते.
कुंभ राशी (Aquarius Horoscope)
कुंभ राशीवर शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. शनी अस्त झाल्यावर कुंभ राशीच्या लोकांना अनेक मोठे फायदे होऊ शकतात. एखाद्या नवीन स्रोतामधून चांगली रक्कम मिळू शकते. मात्र खर्च वाढू शकतात आणि ते त्रास देऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांच्या कामाची दखल घेतली जाईल. मालमत्ता खरेदी-विक्रीसाठी हा काळ चांगला आहे. मात्र बोलताना संयम ठेवा, नाहीतर वाद होऊ शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
