Shani Sadesati: शनी हे एकमेव ग्रह आहेत ज्यांना साडेसाती आणि ढैय्याचं अधिपत्य मिळालं आहे. म्हणजे इतर कोणत्याही ग्रहाचा असा प्रभाव लोकांवर होत नाही. साडेसातीला लोक नेहमीच कष्टांशी जोडून पाहतात, कारण या काळात शनीदेव व्यक्तीची कठीण परीक्षा घेतात.
शनी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक अडचणी देतात. नोकरी आणि व्यवसायात संघर्ष निर्माण करतात, पण या सगळ्यातून शनी व्यक्तीला भविष्यासाठी तयार करत असतात. त्यामुळे साडेसातीनंतर व्यक्तीला मोठं यश मिळतं.
सध्या मेष, कुंभ आणि मीन या तीन राशींवर साडेसाती वेगवेगळ्या टप्प्यांत सुरू आहे. त्यामुळे तिन्हीं राशींसाठी दिलासा मिळण्याचा काळही वेगवेगळा आहे.
संघर्षानंतर मिळतं यश
साडेसातीच्या साडेसात वर्षांच्या काळात व्यक्तीला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शनी खूप मेहनत करवून घेतात आणि त्या तुलनेत कमी फळ देतात. संघर्ष खूप असतो, पण या संघर्षानंतर व्यक्ती खूप यशस्वीही होते. यामागे काही कारणं आहेत.
साडेसातीनंतर यश मिळण्याची कारणं
जे लोक साडेसातीच्या काळात हार मानत नाहीत, चांगलं वर्तन ठेवतात, चुकीच्या कामांपासून दूर राहतात आणि मन लावून मेहनत करतात, त्यांच्यावर शनी कृपा करतात. फक्त साडेसातीच्या काळात काही गोष्टी समजून घेणं आणि त्यांचा स्वीकार करणं गरजेचं असतं.
- शनी असे कष्ट देतात की व्यक्ती मानसिकदृष्ट्या मजबूत बनते. तिला आपले-परके कोण हे समजतं. कठीण काळात कोणी साथ दिली आणि कोणी नाही हे कळतं. तसेच चुकीच्या नात्यांपासून दूर राहायला शिकवतात.
- शनी अपयश देतात, ज्यामुळे व्यक्तीचा अहंकार तुटतो.
- शनी खूप मेहनत करवून घेतात आणि अनेक आव्हानं देतात. त्यामुळे व्यक्ती आगीत तावून-सुलाखून निघालेल्या सोन्यासारखी मजबूत बनते. शनी तिला खूप काही शिकण्याची संधी देतात.
- शनी कर्मानुसार फळ देतात. म्हणजे जो चांगले कर्म करतो, त्याला चांगलं फळ मिळतं.
- आर्थिक नुकसान किंवा पैशांची तंगी देतात, जेणेकरून व्यक्ती चुकीच्या सवयी सोडते.
शेवटी शनी व्यक्तीला कायमस्वरूपी यश देतात. साडेसातीच्या मोठ्या संघर्षातून व्यक्ती संयमी आणि संवेदनशील बनते. तिच्यामध्ये अनेक चांगले गुण येतात, ज्यामुळे ती यशाच्या मार्गावर पुढे जाते. त्याचबरोबर ती धनवान होते आणि समाजात मान-सन्मानही मिळवते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
