Shani Sadesati Zodiac Signs: वैदिक ज्योतिषानुसार, कुंडलीतील शनी ग्रहाची स्थिती व्यक्तीच्या आयुष्यावर प्रभाव टाकते. एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीतील बारावे, पहिले आणि दुसरे भावातून शनीचा गोचर होत असताना त्या व्यक्तीवर शनीची साडेसाती असते. २०२६ मध्ये तीन राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे. ही साडेसात वर्षे चालते. सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरू आहे.
शनीची साडेसाती
शनी ग्रहाने २९ मार्च २०२५ रोजी शनिवारी रात्री ११ वाजून १ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश केला होता. सध्या शनी मीन राशीतच आहे. २०२६ मध्ये शनीचा कोणताही राशीबदल होणार नाही. शनी ग्रह ३ जून २०२७ रोजी गुरुवारी सकाळी ६ वाजून २३ मिनिटांनी मेष राशीत प्रवेश करेल. शनीच्या या स्थितीमुळे आणि प्रभावामुळे कोणत्या राशींना शनीच्या साडेसातीतून कधी दिलासा मिळणार, हे येथे जाणून घ्या.
मेष राशीवर शनीची साडेसाती
ज्योतिषांच्या मते, मेष राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे. या काळात त्यांना तणाव आणि आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे संयम आणि धीराने वागणे आवश्यक आहे. वैदिक ज्योतिषानुसार, पुढील वर्षी शनी मेष राशीत प्रवेश करेल. मेष राशीवरील शनीची साडेसाती २०३२ मध्ये संपेल.
कुंभ राशीवर शनीची साडेसाती
कुंभ राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात त्यांना साडेसातीतून दिलासा मिळेल. आयुष्यातील अनेक अडचणी दूर होतील. शनी मेष राशीत प्रवेश करताच जून २०२७ मध्ये कुंभ राशीवरील शनीची साडेसाती संपेल.
मीन राशीवर शनीची साडेसाती
सध्या शनी मीन राशीत आहे. त्यामुळे मीन राशीच्या लोकांवर त्याचा प्रभाव अधिक राहू शकतो. या राशीच्या लोकांवर शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरू आहे. त्यांना आर्थिक अडचणी येऊ शकतात. तसेच करिअरमध्येही अनेक आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. मीन राशीच्या लोकांना ऑगस्ट २०२९ मध्ये शनीच्या साडेसातीतून दिलासा मिळेल. साडेसातीच्या काळात शनी दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि शनीची कृपा मिळवण्यासाठी काही उपाय करावेत.
शनीच्या अशुभ प्रभावापासून बचाव करण्याचे उपाय
शनिवारी शनी मंदिरात जाऊन मोहरीचे तेल आणि काळे तीळ अर्पण करा. तसेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. नियमितपणे हनुमान चालीसाचे पठण करा. काळी उडीद डाळ, मोहरीचे तेल, काळे तीळ आणि काळे कपडे गरजू लोकांना दान करा.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
