Trigrahi Yog 2025 Impact in Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीत गोचर करून त्रिग्रही योग आणि राजयोग तयार करतात; ज्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होतो. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मीन राशीत ग्रहांची मोठी हालचाल होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, ग्रहांची चाल ठरावीक वेळेनुसार बदलत असते. त्यामुळे त्रिग्रही योग निर्माण होतो. चंद्राने आज दुपारी १२:०८ वाजता मीन राशीत प्रवेश केला आहे. शुक्र आणि शनी आधीपासूनच मीन राशीत विराजमान आहेत. अशा परिस्थितीत या तीन ग्रहांच्या संयोगाने त्रिग्रही योग निर्माण झाला आहे. मीन राशीत निर्माण होणारा त्रिग्रही योग अनेक राशींच्या लोकांचे भाग्य उजळवू शकतो. चला जाणून घेऊ या भाग्यवान राशींबद्दल…
‘या’ राशींच्या लोकांचं नशीब पालटणार?
मिथुन
त्रिग्रही योग मिथुन राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरू शकतो. या काळात नशिबाची उत्तम साथ लाभू शकते. मेहनतीचे यथायोग्य फळ मिळू शकेल. भागीदारीच्या कामात फायदा होऊ शकतो. छोट्या प्रवासाची शक्यता राहील. प्रियकराशी संबंध चांगले राहू शकतात. तसेच मनात चांगले, सकारात्मक विचार निर्माण होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी केलेल्या मेहनतीचे शुभ फळ मिळू शकते. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अतिशय अनुकूल ठरू शकतो. यादरम्यान घरातही शांत वातावरण राहण्याची शक्यता आहे.
कर्क
त्रिग्रही योग बनल्याने कर्क राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. या काळात तुम्हाला व्यवसायातही भरपूर फायदा होऊ शकतो. गुंतवणुकीतून चांगले लाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये एखादे मंगल कार्य घडण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन आनंदी राहणार आहे. अनेक दिवसांपासून असलेले परदेशात जाण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकते. गुंतवणुकीतून तुम्हाला भरपूर नफा मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी मान-सन्मान वाढणार आहे.
मकर
त्रिग्रही योगाची निर्मिती मकर राशीच्या लोकांसाठी वरदान ठरू शकते. या काळात तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. तुम्हाला काही प्रवास करावे लागतील, जे फायदेशीर ठरतील. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यात यश मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रात प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात. आर्थिक लाभ होऊ शकतो. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. नोकरीत पगारात वाढ होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात लोकांच्या आरोग्यात सुधारणा होऊ शकते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)