scorecardresearch

Premium

२८ डिसेंबरपासून लक्ष्मी नारायण ते मालव्य, ७ राजयोग बनल्याने ‘या’ राशींच्या दारी येईल अपार सुख; श्रीमंती नांदेल घरी

New Year Rashi Bhavishya: डिसेंबर महिन्यातील हे राजयोग शेवटाकडे तयार होत असल्याने यामुळे नववर्षातील कामाला वेग मिळणार आहे यातूनच प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

Shani Shukra Budha made Lakshmi Narayan Malavya other 7 Rajyog after 28 december new year will bring more money for these rashi
२८ डिसेंबरपासून जुळणार ७ राजयोग; 'या' मंडळींच्या नशीबाचं होणार सोनं (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

December Month Seven Important Rajyog Rashibhavishya: डिसेंबर महिन्यात तब्बल पाच ग्रहांचे राशी व नक्षत्र परिवर्तन होणार आहे. जेव्हा एखादा ग्रह आपल्या कक्षेत महत्त्वाच्या हालचाली करतो तेव्हा त्याचा प्रभाव १२ राशींवर दिसून येतो. काही वेळा जेव्हा ग्रह आपल्याच कक्षेत भ्रमण करत असताना एकमेकांच्या समोर येतात तेव्हा त्यातून राजयोग निर्माण होत असतात. डिसेंबर महिन्याच्या शेवटाकडे यंदा तब्बल सात राजयोग तयार होत आहेत. सर्वात महत्त्वाचा राजयोग म्हणजेच लक्ष्मी नारायण योग २८ डिसेंबरला वृश्चिक राशीत तयार होत आहे. दुसरीकडे बुध- शुक्र युतीमुळे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होत आहे, यातच गुरूचा प्रभाव असल्याने समसप्तक राजयोग तयार होणार आहे. याशिवाय शुक्राचा मालव्य राजयोग, महाधनी राजयोग, धनशक्ती राजयोग व काम राजयोग तयार होणार आहेत. या सात राजयोगांचा शुभ प्रभाव तीन राशींवर प्रामुख्याने दिसून येणार आहे. डिसेंबर महिन्यातील हे राजयोग शेवटाकडे तयार होत असल्याने यामुळे नववर्षातील कामाला वेग मिळणार आहे यातूनच प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

डिसेंबर महिन्यात सात राजयोग, ‘या’ तीन राशीच्या मंडळींना प्रचंड श्रीमंतीचा योग

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीसाठी धनवृद्धी व प्रगतीसाठी नवीन वर्षात अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. सर्व प्रबळ राजयोग तुमच्या कर्म भावात असल्याने तुम्हाला नोकरीत प्रगतीची नामी संधी मिळू शकते. जर तुम्ही परदेशात नोकरीच्या संधी शोधत असाल तर लवकरच तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. आपल्या राशीच्या कुंडली सहाव्या स्थानी शनीचा विपरीत राजयोग तयार होत आहे यामुळे तुम्हाला संतती सुखाची प्राप्ती हाऊ शकते. बुध ग्रहाच्या प्रभावाने तुम्हाला आरोग्याच्या समस्यांमधून सुटका मिळू शकते. जुनाट आजार नष्ट होतील. विद्यार्थ्यांच्या वाटेतील अडथळे दूर झाल्याने एकाग्रता वाढून कामात यश मिळू शकते. गुरु कृपेने प्रत्येक क्षेत्रात यश लाभू शकते परिणामी तुम्हाला प्रचंड श्रीमंती अनुभवता शकते.

young person murder kalyan body well crime
कल्याण मध्ये तरुणाची हत्या करून मृतदेह विहिरीत फेकला
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने २० फेब्रुवारीपासून ‘या’ राशींचे चांगले दिवस सुरु? शनिदेवाच्या कृपेने घरात येऊ शकतो बक्कळ पैसा
dhom dava kalwa water leakage marathi news, dhom dava kalwa water leakage
सातारा : धोम डाव्या कालव्याला पुन्हा पाणी गळती, शेतकऱ्यांकडून संताप
Maharashtra Weather update
राज्यात सर्वत्र हुडहुडी; पारा दहा अंशांच्या खाली; पुण्यात सर्वांत कमी तापमान

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

वृश्चिक राशीत सर्वात लाभदायक असा लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत असल्याने आर्थिक लाभाचे स्रोत रुंदावणार आहेत. याशिवाय आपल्या राशीत मंगळाचा रुचक राजयोग सुद्धा तयार होत आहे. लग्नभावात हा राजयोग तयार होत आहे. आपल्याला विवाहाच्या संधी आहेत. शनी- राहू- मंगळ व गुरु या ग्रहांचा आपल्या राशीत खास प्रभाव असणार आहे त्यामुळे प्रत्येक कामात मिळणारा परिणाम हा सर्वोच्च असेल. तुम्हाला जिथे फायदा होईल तो इतका अधिक असेल की यामुळे तुमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी मिळू शकते. खेळ व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मंडळींना या कालावधीत प्रसिद्धी व समाधान मिळवून देणारी घटना घडू शकते.

हे ही वाचा<<३१ डिसेंबरआधी लक्ष्मीकृपेने मेष ते मीनपैकी तुमच्या राशीला होणार का धनलाभ? अपार श्रीमंतीसह आरोग्य साथ देईल का? 

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

मकर राशीला मागील काही काळात अनेक कामांना ब्रेक लागल्याचा अनुभव आला असेल पण हे सर्व अडथळे येत्या काळात संपुष्टात येणार आहे. शनी आणि गुरूचे उत्तम पाठबळ असल्याने मोठमोठी कामे हातावेगळी कराल. नोकरी व्यवसायात नव्या जबाबदाऱ्यांना संपूर्ण न्याय द्याल. चिकटीची दाद मिळेल. विद्यार्थी वर्गाला ग्रहयोग पूरक आहेत. उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचे असल्यास संधी सोडू नका. नोकरी व्यवसायात आपले अंदाज खरे ठरतील. कामानिमित्त प्रवास कराल. हुरूप वाढेल. जोडीदाराच्या साथीने घेतलेले महत्वाचे निर्णय योग्य ठरतील. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळेल. विचारांमुळे मानसिक दमणूक होईल पण मिळणारे यश हे तुमचा सगळा थकवा दूर करणारे असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shani shukra budha made lakshmi narayan malavya other 7 rajyog after 28 december new year will bring more money for these rashi svs

First published on: 01-12-2023 at 14:27 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×