scorecardresearch

Premium

३० जूनपर्यंत ‘या’ राशी होतील लखपती, तर ‘या’ मंडळींच्या कुंडलीत कष्ट? शनी-सूर्य गोचराने कसे ठरेल १२ राशींचे भविष्य?

Shani Surya Gochar June 2023: प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक सोनल चितळे यांनी दिलेल्या माहितीवर आधारित तुमच्या राशीला जून महिना कसा जाणार हे पाहूया…

Shani Surya Budh Gochar In June Month To bring Lakhs of Rupees Earning To Lucky Zodiac Signs Monthly Astrology Horoscope
३० जूनपर्यंत 'या' राशी होतील लखपती? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

June Month Astrology 12 Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक कालावधीनांनंतर आपले स्थान बदलून राशी व नक्षत्र परिवर्तन करत असतो. यानुसार १२ राशींवर त्याचा शुभ- अशुभ प्रभाव पडत असतो. साधारणतः प्रत्येक महिन्यात काही अंशी ग्रहांचे स्थान बदलते. त्याचप्रमाणे आता उद्यापासून सुरु होणाऱ्या जून महिन्यातही काही ग्रहांच्या मोठ्या उलाढाली होणार आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ७ जूनला बुध गोचर, १५ जूनला सूर्याचे गोचर, १७ जूनला शनिदेव वक्री आणि मग काही ग्रहांचे उदय व अस्त सुद्धा होणार आहेत. या एकूण ग्रहांच्या स्थितीनुसार कोणत्या राशीवर नेमका कसा प्रभाव पडू शकतो याचा एक आढावा आपण आज घेणार आहोत. प्रसिद्ध ज्योतिष अभ्यासक सोनल चितळे यांनी दिलेल्या माहितीवर आधारित तुमच्या राशीला जून महिना कसा जाणार हे पाहूया…

मेष (Aries Zodiac)

रवी शनीच्या शुभ योगामुळे मेहनत फळास येईल. प्रसिद्धी मिळेल. आपले विचार इतरांपुढे प्रभावीपणे मांडाल. कुटुंबात प्रेमाचे ,सलोख्याचे संबंध निर्माण होतील. जुने वाद संपुष्टात येतील. आर्थिक नियोजन करताना भविष्य काळातील तरतुदीचा देखील विचार करावा. अल्प काळात भरपूर पैसा मिळवण्याच्या पाठी लागू नका. जोडीदारासह जुळवून घेण्याची जबाबदारी आपली असेल. पडझड होणे , मार लागणे यापासून सावधगिरी बाळगावी. विद्यार्थ्यांना गुरुजनांकडून चांगले मार्गदर्शन मिळेल.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

वृषभ (Taurus Zodiac)

नव्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत होईल. आपल्या राशीतील रवी आणि बुध प्रभावी सादरीकरण करण्यास मदत करतील. गुरुबल कमजोर असल्याने अपेक्षित यश मिळवण्यासाठी बेसावध न राहता कसून मेहनत घ्यावी लागेल. विद्यार्थी वर्गाने देखील शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीपासूनच जोरकस तयारी करावी. नोकरीमध्ये मेहनतीसह बुद्धीचातुर्याचा अवलंब करावा लागेल. राजकारणापासून दूर राहा. कामानिमित्त देशांतर्गत प्रवास कराल. धैर्य आणि संयम यांचा अवलंब करावा लागेल.

मिथुन (Gemini Zodiac)

व्यवसाय ,उद्योगधंदा करणाऱ्यांना परदेशातील संधी उपलब्ध होतील. विवाहोत्सुकांच्या प्रयत्नांना यश मिळेल. विवाहीत दाम्पत्यांनी आपले गुण दोष एकमेकांपुढे मांडून नात्यात पारदर्शकता ठेवावी. विद्यार्थीवर्गाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करावे. धरसोडपणा टाळावा. गुंतवणूकदारांना आर्थिक लाभ होतील. स्थावर मालमत्तेच्या कामात अडचणी येतील. नोकरदारवर्गाला बदलीचे योग आहेत. संतती प्राप्तीच्या दृष्टीने वैद्यकीय सल्ला आणि उपचार घेण्याची तयारी ठेवावी. मानसिक ताण घेऊ नये.

कर्क (Cancer Zodiac)

आपल्या राशीतील मंगळ शुक्राचे भ्रमण रोजच्या जगण्याचा आनंद घ्यायला शिकवेल. नित्याच्या गोष्टीतही नावीन्य फुलवाल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात कठीण विषयांवर सुरुवातीपासूनच विशेष लक्ष केंद्रित करावे. नोकरी व्यवसायात करारी आणि धोरणी वृत्ती उपयोगी पडेल. व्यवसाय वृद्धीसाठी कालावधी चांगला आहे. अतिरिक्त खर्चावर आळा घालण्याची गरज भासेल. अन्यथा कितीही पैसा कमावलात तरी पुरे पडणार नाही. वेळीच खबरदारी घ्यावी. ज्वराचे निदान लवकर होणार नाही.

सिंह (Leo Zodiac)

भाग्य स्थानातील गुरू, राहू, हर्षल परदेशासंबंधित कामांसाठी पूरक ठरतील. उच्च शिक्षण घेण्यास परदेशी जायचे असल्यास त्यासंबंधीची कामे मार्गी लागतील. नोकरीत आपल्या मताला मान मिळेल. वरिष्ठांचा पाठिंबा महत्वाचा ठरेल. बढतीचे योग येतील. व्यावसायिकांनी नव्या संकल्पना अमलात आणाव्यात. फायद्याचे ठरेल. प्रगतीचा आलेख उंचावेल. प्रिय व्यक्तींच्या भेटीगाठी उत्साहवर्धक असतील. जोडीदाराची धोरणी वृत्ती आणि योग्य निर्णय यांमुळे कुटुंबाचे भले होईल. संसर्गजन्य आजारांपासून सावधान !

कन्या (Virgo Zodiac)

भाग्य स्थानातील वृषभ राशीतून बुध भ्रमण करत असेल. बुद्धिमत्ता आणि कलाकौशल्य यांचा मिलाप दिसून येईल. कामातील आखीवरेखीवपणा टिपण्यासारखा असेल. भाग्य आणि दशमातील रवीचे भ्रमण आपल्याला धीर देणारे असेल. जोडीदाराच्या कामकाजात अडीअडचणी येतील. विद्यार्थी वर्गाने या नव्या शैक्षणिक वर्षात अधिक सतर्क राहणे गरजेचे ठरेल. बुद्धिमत्तेला सरावाची जोड हवीच. गुरुबल कमजोर आहे. लाभ स्थानातील शुक्र मंगळाच्या जोरावर मेहनतीचे फळ मिळण्यास मदत होईल. स्नायू, स्नायूबंध आखडतील. ताठर होतील.

तूळ (Libra Zodiac)

ग्रहांची साथ चांगली आहे. नोकरी व्यवसायात प्रगती कराल. धनसंपत्ती वाढेल. आनंदाच्या वार्ता समजतील. विवाहीत दाम्पत्यांनी एकमेकांसाठी वेळ काढावा. समस्यांचे निराकरण होईल. विद्यार्थी वर्गाने या नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. गुरुबल चांगले असल्याने विशेष लाभ मिळतील. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींचा पाठिंबा मिळेल. तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारी येतील पण वैद्यकीय निदान लगेच होणार नाही.

वृश्चिक (Scorpio Zodiac)

कामानिमित्त वा कामाव्यतिरिक्त प्रवास कराल. तसेच वाहन खरेदीसाठी चांगले योग आहेत. भाग्य स्थानातील मंगळ, शुक्र आपल्या आवडीनुसार जगण्याची संधी उपलब्ध करून देतील. विद्यार्थी वर्गाला नव्या विषयांची आवड निर्माण होईल. जोडीदार चार समजुतीच्या गोष्टी सुचवेल. त्याचे ऐकलेत तर सर्वांचाच लाभ होईल. नोकरी व्यवसायात काही गोष्टी मनाविरुद्ध घडतील. संयम ठेवा. चुकीच्या गोष्टींना नक्की विरोध करा. छाती, फुप्फुसे यांचे आरोग्य जपा. प्रदूषणाचा त्रास होईल. वैद्यकीय सल्ला आवश्यक !

धनु (Sagittarius Zodiac)

जोडीदाराच्या कर्तृत्वाचा आलेख उंचावेल. एकमेकांच्या साथीने कौटुंबिक प्रश्न सोडवाल. विद्यार्थी वर्गाला नवे विषय आत्मसात करणे सोपे जाईल. शनीची चिकाटी आणि गुरुची प्रगल्भता यामुळे नोकरी व्यवसायात नेटाने आगेकूच कराल. नाविन्यपूर्ण गोष्टी समाजापुढे आणाल. लोकप्रियता मिळेल. आर्थिकदृष्ट्या चांगले लाभ होतील. रक्तदाब आणि पित्तविकार यांचा त्रास संभवतो. कामाचा ताण न घेता वेळेचे योग्य नियोजन करावे. आपले छंद, आवड यासाठी वेळ राखून ठेवाल.

मकर (Capricorn Zodiac)

गुरुबल कमजोर असल्याने प्रचंड मेहनत घेणे आवश्यक ठरेल. शनीची साथ असल्याने मेहनतीचे फळ चांगले मिळेल. नोकरीच्या बाबतीत चर्चा सत्रात महत्त्वाचे मुद्दे उचलून धराल. वरिष्ठ मंडळींवर आपल्या सादरीकरणाचा प्रभाव पडेल. व्यवसायात जिद्दीने आगेकूच कराल. जोडीदाराच्या स्वभावानुसार त्याची कामे तो निगुतीने पूर्ण करेल. विद्यार्थी वर्गाला रवी, बुधाच्या पाठबळाने विषय चटकन आत्मसात होईल. संतानप्राप्ती संबंधीत उपाय करताना थोडे सबुरीने घ्यावे.

कुंभ (Aquarius Zodiac)

स्थावर मालमत्तेविषयी हालचाल सुरू होतील. खरेदी, विक्री वा सरकारी कागदपत्रे यासारख्या कामांना गती मिळेल. नोकरीच्या कामात सहकारी वर्गाकडून उत्तम साथ मिळाल्याने उत्साह वाढेल. उद्योजक, व्यावसायिक मंडळींना नवे प्रकल्प सादर करण्यास योग्य कालावधी आहे. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात जोरदार करावी. बुद्धिमत्तेला मेहनतीची जोड मिळाली तर अधिक फायदेशीर ठरेल. जोडीदाराच्या कामाचे सर्वत्र कौतुक होईल.

हे ही वाचा<< उद्यापासून ६ जुलै पर्यंत ‘या’ राशींना तिजोरीत मोठा धनलाभ मिळणार? लक्ष्मीकृपेसह अनुभवू शकता शुक्राचे चांदणे

मीन (Pisces Zodiac)

परिस्थितीत सुधारणा होईल. आत्मविश्वासाने आगेकूच कराल. महत्वाचे निर्णय घेताना त्याचे होणारे परिणाम देखील विचारात घ्यावेत. नोकरीतील सहकारी वर्गाकडून विशेष साथ मिळेल. व्यवसाय, उद्योगात नवी भरारी घ्याल. व्यावसायिक नाते संबंध जपल्याने अनेक जण मदतीला येतील. जोडीदाराच्या समयसूचकतेमुळे मोठे नुकसान टळेल. प्रेमसंबंध दृढ होतील. कफविकार आणि वाताचा त्रास बळावेल. वेळच्यावेळी वैद्यकीय तपासणी उपयोगी ठरेल.

-सोनल चितळे

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-05-2023 at 10:34 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×