Trigrahi Yog in Kumbh: ज्योतिषशास्त्रात ग्रहांची युती महत्वाची मानली जाते. ग्रहांच्या युतीचा काही राशींवर शुभ परिणाम होतो तर काहींवर अशुभ परिणाम होतो. शनिदेव आपल्या कुंभ राशीत विराजमान आहेत तर, आता या राशीत सूर्यदेव आणि बुधदेव प्रवेश करणार आहेत. त्यामुळे तब्बल ३० वर्षांनी तीन ग्रहांच्या युतीने ‘त्रिग्रही योग’ निर्माण होत आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, १३ फेब्रुवारीला सूर्यदेव आणि २० फेब्रुवारीला बुधदेव शनिदेवाच्या कुंभ राशीत प्रवेश करतील, या तिन्ही ग्रहांच्या शुभ युतीमुळे काही राशींना येत्या दिवसात सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. त्यांना आयुष्यात सुख समृध्दी आणि अपार यश लाभण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘या’ राशींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण?

मेष राशी

या राशीच्या अकराव्या भावात त्रिग्रही योग निर्माण होत असल्याने मेष राशीच्या लोकांना जीनवात सकारात्मक परिणाम पाहायला मिळू शकतात. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे मिळवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. तुम्ही कुठेतरी गुंतवणूक केली असेल, तर तिथून तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. तुमचं जीवन प्रकाशासारखं चमकण्याची शक्यता आहे. तुम्हाला काही खास वस्तू भेट या काळात मिळू शकतात. नोकरदार लोकांना बढती मिळण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : तब्बल ५०० वर्षांनी ‘केदार राजयोग’ बनल्याने ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? लक्ष्मी कृपेने बलाढ्य धनलाभ होण्याची शक्यता )

वृषभ राशी

त्रिग्रही योग या राशीच्या दहाव्या भावात निर्माण होत असल्याने वृषभ राशीच्या लोकांना चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. यावेळी शेअर बाजार, सट्टेबाजी आणि लॉटरीमधून पैसे कमवू शकता. प्रॉपर्टीच्या व्यवहारातूनही फायदा होऊ शकतो. यावेळी तुम्ही वाहने आणि मालमत्ता देखील खरेदी करू शकता. या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये शुभ परिणाम पाहायला मिळू शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहण्याची शक्यता आहे. भाऊ-बहिणींचे सहकार्य तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या नवव्या भावात त्रिग्रही योग निर्माण होत आहे. त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रचंड फायदे मिळू शकतात. यावेळी तुमचे उत्पन्न वाढू शकते. अनपेक्षित आर्थिक लाभही होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. कामामध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना अधिक नफा मिळविण्याच्या संधीही मिळू शकतात. नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळू शकतं. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani surya budh make trigrahi yog 2024 positive impact on these zodiac signs bank balance to raise money pdb
First published on: 27-01-2024 at 11:23 IST