Saturn and Sun Yuti 2026: ज्योतिषशास्त्रात सूर्य आणि शनीला पिता-पुत्र म्हटले जाते, परंतु या दोन्ही ग्रहांमध्ये शत्रुत्व असल्याने अनेकदा या दोन ग्रहांची युती काही राशींसाठी हानिकारक ठरू शकते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. तसेच शनी ग्रहाला कर्मफळ दाता म्हटले जाते.
पंचांगानुसार, सध्या शनीदेव मीन राशीत विराजमान असून लवकर याच राशीत सूर्यदेव प्रवेश करणार आहेत. १५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ०८ मिनिटानी सूर्य मीन राशीत जाणार असून सूर्याच्या या प्रवेशाने मीन राशीमध्ये शनी आणि सूर्याची युती निर्माण होईल. या युतीच्या नकारात्मक प्रभावाने काही राशींच्या आयुष्यात नकारात्मकता येऊ शकते.
शनी-सूर्याची जोडी ‘या’ राशींसाठी घातक ठरणार
कुंभ (Kumbha Rashi)
कुंभ राशीसाठी हा काळ मानसिक तणावाने भरलेला राहू शकतो. कार्यस्थळी अडचणी निर्माण होऊ शकतात. वरिष्ठांशी मतभेद संभवतात. आरोग्याच्या बाबतीत काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. काही लोकांना दिशाभूल करणारी बातमी मिळू शकते. या काळात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वाढू शकते.मानसिक तणावामुळे शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. विनाकारण पैसे खर्च केल्याने तुमचे बजेट नंतर बिघडू शकते. करिअरमध्ये यश मिळणार नाही.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या लोकांसाठी या काळात अडचणी वाढू शकतात. या राशीच्या व्यक्तींना आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. या काळात जवळच्या व्यक्तींशी मतभेद होण्याची शक्यता आहे. शरीरातील दुर्बलता जाणवेल. या काळात कुणालाही उधार देणे टाळा, पैसा अडकू शकतो. घरगुती वाद आणि क्रोधाचा उद्रेक तुमचे संबंध बिघडवू शकतो. एक मोठा फायदेशीर करार तुमच्या हातातून निसटू शकतो. धनप्राप्तीच्या मार्गात अडथळे येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी तुम्हाला संघर्षाला सामोरे जावे लागू शकते.
तूळ (Tula Rashi)
तूळ राशीच्या लोकांसाठी देखील शनी-सूर्याची युती गंभीर परिणाम देणारी असेल. तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल होतील. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. मानसित थकवा जाणवू शकतो. आर्थिक समस्या उद्भवतील. प्रचंड चिडचिड होईल. कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळू शकतो. कामाचे कौतुक केले जाणार नाही. गुंतवणूक करणे अयशस्वी ठरेल. कुटुंबात मतभेद होऊ शकतात. प्रेमसंबंधांमध्ये दुरावा येऊ शकतो.
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या लोकांसाठी वाईट काळ सुरू होऊ शकतो. या काळात तुमची कुणाकडूनही फसवणूक होऊ शकते, त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य चिंतेचे कारण असू शकते. वैवाहिक जीवनात अडचणी येऊ शकतो. या काळात मोठं आर्थिक नुकसानदेखील होऊ शकते. नोकरीशी संबंधित ऑफर जाऊ शकतात. आरोग्य खालावणे, कामाच्या ठिकाणी वादविवाद, घरातील सदस्यांशी मतभेद, अचानक खर्च आणि व्यापारात घट याचा अनुभव येऊ शकतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
