Saturn and Sun Yuti 2025: ज्योतिषशास्त्रानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानले जाते. सूर्याचे प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन होते. कुंडलीत सूर्य शुभ असेल, तर व्यक्तीला आयुष्यात आत्मविश्वास, यश, मान-सन्मान, पैसा, पद यांसारख्या बऱ्याच गोष्टी प्राप्त होतात. तसेच शनी ग्रहाला कर्मफळ दाता म्हटले जाते. सध्या सूर्य मिथुन राशीत असून शनीदेव मीन राशीत विराजमान आहे.
पंचांगानुसार, ३ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजून ४० मिनिटांनी शनी-सूर्य एकमेकांपासून १०० डिग्रीवर असतील. ज्यामुळे शातंक नावाचा योग निर्माण होईल. या योगाच्या शुभ प्रभावाने १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींना त्याचा फायदा होईल.
शनी-सूर्याची युती करणार कमाल
कर्क (Kark Rashi)
कर्क राशीच्या व्यक्तींसाठी शनी-सूर्याची युती खूप लाभदायी सिद्ध होणार आहे. . या काळात तुमचा भाग्योदय होईल. मेहनत केलेल्या कामात हवे तसे यश मिळविता येईल. आर्थिक परिस्थिती उत्तम होईल. करिअर आणि व्यवसायात मानासारखे यश प्रस्थापित कराल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनी-सूर्याची युती अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात समस्यांपासून सुटका होईल. ताणतणाव दूर होण्यास मदत होईल, मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. तुमची आर्थिक परिस्थितीही उत्तम राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल. शत्रूंवर विजय मिळवाल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल.
मकर (Makar Rashi)
शनी-सूर्याची युती धनु राशीसाठी अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. वैवाहिक जीवन सुखमय असेल. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)