scorecardresearch

१६ जानेवारीपर्यंत ‘या’ ३ राशींवर असेल शनिदेवाची वाकडी नजर; होऊ शकते प्रचंड धनहानी! वेळीच व्हा सावध

Shani Transit 2023: १६ जानेवारीपर्यंत, अनेक राशीच्या राशीच्या लोकांचे नुकसान होऊ शकते. व्यवसायातही नुकसान होऊ शकते.

१६ जानेवारीपर्यंत ‘या’ ३ राशींवर असेल शनिदेवाची वाकडी नजर; होऊ शकते प्रचंड धनहानी! वेळीच व्हा सावध
फोटो: संग्रहित

Shani Transit 2023: नवीन वर्षाचा प्रारंभ दिवस अनेक राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल असू शकतो. शनिदेव १७ जानेवारीला राशी बदलून मकर राशीतून कुंभ राशीत जातील. तोपर्यंत अनेक राशीच्या लोकांसाठी हा वेळ लाभदायक ठरणार नाही. ज्योतिष शास्त्रानुसार अनेक राशींवर शनिदेवाच्या साडेसातीचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे नुकसानही होऊ शकते. व्यवसायात नुकसानासोबतच धनहानीही होऊ शकते.

‘या’ राशीच्या लोकांनी काळजी घ्यावी

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव सध्या आपल्या राशीत मकर राशीत आहेत. यामुळे अनेक राशीच्या लोकांवर याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. या काळात शनिदेवाचा त्रास कुंभ, मकर आणि धनु राशीत राहील, त्यामुळे या राशीच्या लोकांचे नुकसान होऊ शकते. ज्याच्यावर शनिदेवाची साडेसती असते त्या राशींना आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते.

( हे ही वाचा: अडीच वर्षांनी शनिदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; २०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना मिळणार प्रचंड धनलाभाची संधी)

यासोबतच १६ जानेवारी पर्यंत या राशीच्या लोकांना व्यवसायात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणताही महत्वाचा निर्णय घेताना जपूनच घ्या. काही लोकांना या काळात करिअरमध्ये यश मिळणार नाही तसंच तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय तिथे अनेक अडचणी येऊ शकतात. तसेच प्रचंड धनहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १६ जानेवारीपर्यंत कुंभ, मकर, धनु यांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-12-2022 at 10:37 IST

संबंधित बातम्या