Saturn Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठरावीक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायप्रिय देवता व कर्मफलदाता म्हटले जाते. जे लोक नेहमी न्यायाचे पालन करतात आणि चांगले कर्म करतात अशा व्यक्तींवर शनीदेवाची सदैव कृपा असते. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, २८ मार्च २०२५ पर्यंत शनी याच राशीत असेल. त्यानंतर शनी मीन राशीत प्रवेश करील. दरम्यान, तोपर्यंत हा २१६ दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी असेल.
२१६ या राशींना शनी करणार मालामाल
मेष
कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढचे २१६ दिवस अनेक चांगले बदल घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. आर्थिक परिस्थिती सुधारेल. महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करून घ्या. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
सिंह
कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. तुम्हाला तुमच्या आई-वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. २१६ दिवसांच्या या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मात्र, प्रेमसंबंधांमध्ये गैरसमज होतील, ते दूर करण्याचा प्रयत्न करा. या दिवसात भाग्याची साथ मिळेल.
तूळ
शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा २१६ दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचा माणसिक तणाव दूर होईल. या काळात तुम्हाला आर्थिक चणचण भासणार नाही. त्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)