scorecardresearch

२०२३ सुरु होताच ‘या’ ४ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? शनिचा दुर्मिळ ‘महालक्ष्मी राजयोग’ तुमच्या राशीत आहे का?

Mahalaxmi Rajyog In 2023: या ४ राशींना महालक्ष्मी राजयोगाने प्रचंड धनलाभाची संधी मिळणार आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे आपण जाणून घेऊयात

२०२३ सुरु होताच ‘या’ ४ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? शनिचा दुर्मिळ ‘महालक्ष्मी राजयोग’ तुमच्या राशीत आहे का?
२०२३ सुरु होताच 'या' ४ राशींना लक्ष्मी बनवणार श्रीमंत? (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mahalaxmi Rajyog In 2023: ज्योतिष शास्त्रानुसार २०२३ हे वर्ष अत्यंत शुभ ठरणार आहे. येत्या नववर्षात अनेक महत्त्वपूर्ण ग्रह राशी व नक्षत्र परिवर्तन करणार आहे. येत्या नववर्षाच्या सुरुवातीलाच शनिदेव आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. १७ जानेवारीला हे राशी परिवर्तन पूर्ण होणार आहे. तर १५ फेब्रुवारीला शुक्र सुद्धा आपली उच्च रास मीनमध्ये प्रवेश करणार आहे. या शनि व शुक्राच्या युतीने महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. याचा प्रभाव ४ राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे असे ज्योतिष अभ्यासकांचे अंदाज आहेत. या ४ राशींना महालक्ष्मी राजयोगाने प्रचंड धनलाभाची संधी मिळणार आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होणार हे आपण जाणून घेऊयात..

महालक्ष्मी राजयोगाने ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत?

कर्क (Cancer Zodiac)

महालक्ष्मी राजयोग हा कर्क राशीसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. महालक्ष्मी राजयोग हा आपल्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत आहे. यामुळे आपल्याला भाग्योदयाचे योग आहेत. जर आपण नव्या नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला आयत्या नववर्षाच्या पहिल्या तीन महिन्यातच प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. आपल्याला गुंतवणुकीतून अत्यंत लाभदायक रिटर्न्स मिळू शकतात. जर तुम्ही परदेश वारीच्या विचारात असाल तर येत्या काळात तुमचा विचार प्रत्यक्षात उतरण्याची पूर्ण शक्यता आहे.

Yearly Horoscope 2023 : जानेवारी ते डिसेंबर या १२ महिन्याचं वार्षिक राशीभविष्य; जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसं असणार आगामी वर्ष

कन्या (Virgo Zodiac)

महालक्ष्मी राजयोग बनल्याने कन्या राशीला आर्थिक व वैवाहिक सुखाची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. आपल्या राशीच्या सातव्या स्थानी महालक्ष्मी राजयोग तयार होत आहे. आपल्याला येत्या काळात आपल्या जोडीदाराच्या साथीने प्रचंड धनलाभ होऊ शकतो. आपल्याला कुटुंबासह वेळ घालवण्याची सुवर्णसंधी लाभेल. आपल्याला कुटुंबातील सदस्यांसह मिळून एक व्यवसाय सुरु करण्याची संधी मिळू शकते ज्यातून प्रचंड धनलाभाचे योग तयार होत आहेत. येत्या काळात कन्या राशीच्या अविवाहित मंडळींना जोडीदार लाभण्याची शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Zodiac)

महालक्ष्मी राजयोग कुंभ राशीसाठी लाभदायक ठरू शकतो. हा योग आपल्या राशीच्या प्रभाव कक्षेत दुसऱ्या स्थानी तयार होत आहे. हे स्थान आर्थिक लाभाचे मानले जाते. यामुळे तुम्हाला येत्या काळात आर्थिक स्थिती लाभदायक असण्याची शक्यता आहे. व्यवसायात आपल्याला प्रचंड व अनपेक्षित लाभ होऊ शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. जर येत्या काळात आपण वाहन खरेदी करू इच्छित असाल तर येणारे वर्ष हे अत्यंत शुभ काळ असू शकतो. जर तुमचे काम वाणी व मीडियाशी संबंधित असेल तर येणारे वर्ष तुम्हाला हिताचे ठरू शकते.

हे ही वाचा<< २०२३ मध्ये २ वेळा लागणार सूर्यग्रहण; ‘या’ राशींना बक्कळ धनलाभाची संधी, ‘या’ राशींना सूर्यदेव देऊ शकतो त्रास

मिथुन (Gemini Zodiac)

महालक्ष्मी राजयोग हा मिथुन राशीसाठी करिअर व व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचा ठरू शकतो. महालक्ष्मी राजयोग हा आपल्या राशीच्या कुंडलीत दहाव्या स्थानी तयार होत आहे. या काळात आपल्याला सर्व अपेक्षित लाभ होऊ शकतात. आपल्या आर्थिक मिळकतीत वाढ होऊन आपल्याला कर्माचे गोड फळ मिळू शकते. आपल्याला धनलाभातून मिळणारा आनंद हा तुमच्या कौतुकाने सुद्धा द्विगुणित होऊ शकतो. आपल्याला जुन्या कामांना एक मार्ग दाखवता येईल.

(टीप: वरील लेख गृहीतके व हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-12-2022 at 18:40 IST

संबंधित बातम्या