scorecardresearch

२०२२ च्या शेवटच्या ७ दिवसात ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? पाहा तुमच्या राशीत आहे का प्रचंड धनलाभाची संधी

Weekly Horoscope: २६ डिसेंबर ते १ जानेवारी या आठवड्यात आपल्यालाही धनलाभ होणार का तसेच येणाऱ्या नवर्वर्षाची सुरुवात कशी होणार हे आता आपण जाणून घेऊयात..

२०२२ च्या शेवटच्या ७ दिवसात ‘या’ राशी होणार अपार श्रीमंत? पाहा तुमच्या राशीत आहे का प्रचंड धनलाभाची संधी
(फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Weekly Horoscope, 26 December to 1st January 2023: वर्ष २०२२ चा शेवटचा आठवडा काही राशींसाठी अनेक शुभ वार्ता घेऊन येत आहे. ज्या गोष्टीसाठी आपण वर्षभर अपार मेहनत घेतली ती गोष्टी आता अवघ्या एका आठवड्यात आपल्याला प्राप्त होऊ शकते. येत्या आठवडाभरात २९ डिसेंबरला शुक्र गोचर व २८ डिसेंबरला बुध ग्रह मार्गी होणार आहेत यामुळे येत्या काळात काही राशींना अत्यंत शुभ काळ सुरु होण्याची शक्यता आहे. २६ डिसेंबर ते १ जानेवारी या आठवड्यात आपल्यालाही धनलाभ होणार का तसेच येणाऱ्या नवर्वर्षाची सुरुवात कशी होणार हे आता आपण जाणून घेऊयात..

मेष

येत्या आठवड्याभरात मेष राशीच्या मंडळींना धनलाभाची प्रचंड मोठी संधी आहे. पण जितकी मोठी संधी तितका मोठा धोका. त्यामुळेच तुम्ही प्रत्येक व्यवहार हा काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. येणाऱ्या ७ दिवसात आरोग्याच्या काही तक्रारी जाणवू शकतात पण आठवडा संपताना तुम्हाला एक नवी ऊर्जा व उत्साह मिळू शकतो .

वृषभ

वृषभ राशीच्या लोकांना या आठवड्यात चढ-उतार अनुभवायला मिळू शकतात. खर्चाचे नियोजन करण्यासाठी बजेट तयार करणे फायद्याचे ठरू शकते. या आठवड्यात गुंतवणूक करणे टाळावे. तसेच येणाऱ्या दिवसांमध्ये रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात लहान-मोठ्या तक्रारी जाणवू शकतात.

मिथुन

मिथुन राशीसाठी २६ व २८ या दोन दिवसांत घाई न करणे हिताचे ठरेल. या आठवड्यात काही अडकून राहिलेले महत्त्वाचे काम पार पडू शकते. व्यवसायातून बरीच मोठी उलाढाल होऊ शकते ज्यामुळे येत्या काळात आपल्याला प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

कर्क

नवीन वर्ष कर्क राशीसाठी अनेक गुड न्यूज घेऊन येणार आहे. आपल्या कामाच्या ठिकाणी मान सन्मान वाढू शकतो. येत्या काळात तुमच्या गुंतवणुकीचे फायदे तुम्हाला प्रचंड धनलाभाच्या रूपात मिळण्याची शक्यता आहे. शक्य असेल तेव्हा जिभेवर साखर व डोक्यावर बर्फ हा नियम पाळायला सुरुवात करा.

सिंह

तुमचा जीव काहीसा घाबरून असण्याची शक्यता आहे. येत्या काळात आर्थिक व्यवहार मार्गी लागतील पण तुम्हाला प्रत्येक वेळी मनात शंका येऊ शकते. अशावेळी कामात घाई करू नका. तुमच्याकडून अनावधानाने कोणाचा अपमान होत नाही याची काळजी घ्या.

कन्या

तुम्हाला येत्या काळात जोडीदाराच्या साथीने प्रचंड धनलाभ मिळवता येऊ शकतो. तुमच्या नवनवीन कल्पनांमधून आर्थिक मिळकतीचे नवे स्रोत तयार होऊ शकतात. तुम्हाला येत्या काळात परदेश वारीचे योग आहेत ज्यामुळे कुटुंबात एक उत्साह व ऊर्जा तयार होईल.

तूळ

तुमच्या प्लॅनिंग नुसार तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. वेळ व संधी साधणे या काळात अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. परदेशी कंपनीच्या माध्यमातून आपल्याला लाभ होऊ शकतो पण कोणताही निर्णय घाईत किंवा गडबडीत, साशंक असताना घेऊ नये.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होण्याची संभावना आहे. व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अडकलेले पैसे यावेळी मिळू शकतात. लग्नासाठी इच्छूक असणाऱ्यांना शुभ वार्ता मिळू शकते. कायदेशीर बाबींमध्ये यश मिळू शकते.

हे ही वाचा<< गजलक्ष्मी राजयोग बनल्याने ‘या’ राशी होणार श्रीमंत? गुरुकृपेने २०२३ च्या ‘या’ महिन्यात प्रचंड धनलाभाची संधी

धनु

धनु राशीसाठी हा आठवडा भाग्यदायी ठरू शकतो. जीवनसाथीचे सहकार्य मिळू शकते. लांबचा प्रवासही होऊ शकतो. दुखापत होण्याची संभावना असल्याने आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. मालमत्तेत गुंतवणूक केल्यास फायदा होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात उत्पन्नात वाढही होऊ शकते.

मकर

या आठवड्यात आपल्याला कुटुंबाची साथ लाभेल. २८ डिसेंबरला बुध ग्रह आपल्या राशीत गोचर करत आहेत तर २९ डिसेंबरला शुक्र ग्रह सुद्धा आपल्या राशीत प्रभावी असतील. या दोन ग्रहांची युती होताच आपल्या नशिबाला कलाटणी मिळू शकते. कौटुंबिक व्यवसाय तुम्हाला सर्वाधिक लाभदायक ठरू शकतो.

कुंभ

या आठवड्यात कुंभ राशीच्या लोकांचे कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी संबंध बिघडू शकतात. विद्यार्थ्यांना करिअरमध्ये चांगले परिणाम मिळू शकतात. या आठवड्यात व्यवहारात सावधगिरी बाळगावी. तुम्हाला वर्ष व आठवडा संपताना प्रचंड मोठ्या स्वरूपात अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो.

मीन

मीन राशीच्या लोकांनी अनोळखी लोकांवर विश्वास ठेवू नये. करिअर व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा. आरोग्याची काळजी घ्यावी. नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होऊ शकतात. वैवाहिक जीवन चांगले राहण्याची संभावना आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहिती व गृहीतके यावर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-12-2022 at 13:36 IST

संबंधित बातम्या