Shukra Gochar 2023 in Meen: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार येत्या नववर्षात शुक्र ग्रह गोचर करून मीन राशीत स्थिर होणार आहे यामुळे अत्यंत दुर्मिळ व शुभ असा मालव्य राजयोग तयार होत आहे. पंचांगाच्या माहितीनुसार नववर्षातील फेब्रुवारी महिन्यात १५ तारखेला बुधवारी रात्री ८ वाजून १२ मिनिटांनी शुक्राचे गोचर होणार आहे. यानंतर काही काळ शुक्रदेव मीन राशीत प्रवेश करून स्थिर होणार आहेत. जेव्हा अशा प्रकारे कोणताही ग्रह मार्गी होतो तेव्हा अन्य ग्रह नक्षत्रांच्या स्थितीनुसार काही शुभ राजयोग तयार होतात असतात. अत्यंत लाभदायक मानल्या जाणाऱ्या पंच महापुरुष योगांपैकी एक म्हणजे मालव्य राजयोग. येत्या नववर्षात हा राजयोग तीन राशींसाठी अत्यंत शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो. ज्योतिषीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार यामुळे विशेषतः शनीचं प्रिय राशींना धनलाभ होण्याची मोठी संधी आहे.

कसा तयार होतो मालव्य राजयोग?

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार जेव्हा शुक्र आपल्या मूळ राशीच्या म्हणजेच वृषभ, तूळ किंवा उच्च राशीत म्हणजेच मीनच्या प्रभाव कक्षेत पहिल्या, चौथ्या, सातव्या किंवा दहाव्या स्थानावर स्थिर होतो तेव्हा मालव्य राजयोग निर्माण होतो. मालव्य योग हा धनलाभाचा संकेत मानला जातो. यामुळेच ज्या राशीच्या भाग्यात हा राजयोग तयार होतो त्यांना येत्या काळात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होते. यावेळी नक्की कोणत्या राशींना या राजयोगाचा लाभ होणार आहे हे जाणून घेऊयात..

Ketu Nakshatra Gochar 2024 Ketu Transit In Hasta Nakshatra Positive Impact On These Zodiac Sign
छाया ग्रह केतूची ‘या’ राशींवर होईल कृपा! नक्षत्र बदलानंतर येतील आनंदाचे दिवस! उत्पन्न वाढवण्याची मिळेल संधी
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
Trigrahi Yog
३० वर्षांनी ‘त्रिग्रही योग’ बनल्याने होळी २०२४ च्या आधी शनिदेव ‘या’ राशींना करणार श्रीमंत? लक्ष्मी कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १२ महिन्यानंतर गुरू राशीमध्ये प्रवेश करणार सूर्यदेव, ‘या’ राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ

वृषभ:

शुक्रदेव वृषभ राशीचे मूळ स्वामी आहेत. यामुळे मालव्य राजयोग असताना या राशीला प्रचंड धनलाभाचे योग आहेत. शुक्र ग्रह हा वैभवदाता मानला जातो व म्हणूनच तुमच्याही भाग्यात येत्या काळात प्रचंड धन, धान्य, समृद्धीचा वर्षाव होऊ शकतो. करिअरमध्ये प्रगतीसाठी येणारा काही काळ अत्यंत शुभ ठरू शकतो. तुम्ही ज्या संधीच्या शोधात आहात ती संधी तुमच्याकडे स्वतःहून चालत येऊ शकते मात्र तुम्ही त्याच सोनं करायला हवं. कामाच्या ठिकाणी तुमची वाहवा झाल्याने मूड उत्तम राहू शकतो.

हे ही वाचा<< १६ डिसेंबरपासून ‘या’ राशींना अपार धनलाभाचे योग; ‘द्विर्द्वादश योग’ बनल्याने पुढील दीड महिन्यात होऊ शकता श्रीमंत

कुंभ:

कुंभ राशीचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत. नववर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच २०२३ जानेवारी १७ ला शनिदेव कुंभ राशीत गोचर करून स्थिर होणार आहेत. अशावेळी मीन राशीत शुक्राचा प्रवेश होताच कुंभ राशीच्या नशिबाला कलाटणी मिळू शकते. येत्या काळात आपण अचानक धनवान होऊ शकता. करिअरमध्ये प्रगतीचे सुद्धा योग आहेत. तुम्हाला कौटुंबिक सुख लाभू शकते मात्र तुम्हाला त्यासाठी काही किंमत मोजावी लागेल असे दिसत आहे.

हे ही वाचा<< तूळ, वृश्चिक, धनु राशीसाठी 2023 वर्ष कसे असणार? शनिदेव प्रसन्न होऊन ‘या’ रूपात देणार प्रचंड धनलाभाची संधी

सिंह:

सिंह राशीसाठी येत्या काळात वैवाहिक सुखप्राप्तीचे योग आहेत. शुक्र हा प्रेमळ ग्रह म्हणून ओळखला जातो. यामुळेच तुम्हाला लवकरच एक खास व्यक्तीचा सहवास अनुभवण्याची संधी मिळू शकते. ज्या मंडळींचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राजकारणाशी संबंध आहे त्यांना मोठी जबाबदारी उचलावी लागू शकते. तुम्ही येत्या काळात आयुष्यातील सर्वात साहसी व सुखाचा काळ अनुभवणार असल्याची चिन्हे आहेत.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)