Saturn Rise In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखाद्या ग्रहाचा उदय किंवा अस्त होतो तेव्हा त्याचा प्रभाव राशी चक्रातील सर्व राशींवर होऊ शकतो. ग्रहांमध्ये शनीला कर्मदेव म्हणून ओळख आहे. प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुरूप फळ देण्याचे काम शनी देव करतात. अनेकदा शनीची दृष्टी ही नकारात्मक मानली जात असली तरी चांगल्या कर्मानुसार शनी देव न्याय देण्याचे सुद्धा काम करतात म्हणूनच त्यांची दुसरी ओळख न्यायदेवता अशी सुद्धा आहे. शनीचा यापूर्वी फेब्रुवारी महिन्यातील ११ तारखेला कुंभ राशीत अस्त झाला होता. सूर्याच्या प्रभावामुळे हा अस्त झाल्याने या कालावधीत शनीची शक्ती कमी होऊन सूर्याचे बळ वाढले होते. तर आता येत्या मार्च महिन्यात १८ तारखेला शनी महाराज कुंभ राशीत पुन्हा उदय करणार आहेत. शनीची शक्ती पुन्हा प्राप्त झाल्याने या नंतरच्या मोठ्या अवधीसाठी काही राशींना प्रचंड फायदा होऊ शकतो. या राशींना एकाअर्थी कोट्याधीश होण्याची संधी मिळू शकते असेही म्हणता येईल.

होळीच्या आधी शनीची शक्ती वाढणार; ‘या’ राशींना लागेल श्रीमंतीचा रंग

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

शनी महाराज कुंभ राशीत उदित होऊन मकर राशीसाठी लाभदायक कालावधी घेऊन येणार आहेत. शनी देव आपल्या राशीच्या धन भावी उदित होणार आहेत. या कालावधीत आपल्याला अचानक व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. वाडवडिलांच्या संपत्तीचा फायदा मिळू शकते. भविष्यात होणाऱ्या फायद्यांसाठी या कालावधीत आपण पाया रचू शकता. करिअरच्या बाबत एखादी मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते. पदोन्नतीचा योग आहे. आपल्या कष्टाचे फळ उत्तम मिळेल. वाहन किंवा प्रॉपर्टीच्या खरेदीचा योग आहे.

Mentally retarded girl pregnant from sexual abuse crime was solved with the efforts of Bharosa Cell
लैंगिक अत्याचारातून मतीमंद मुलगी गर्भवती; भरोसा सेलच्या प्रयत्नाने उलगडला गुन्हा
Boy killed for resisting unnatural act Sheel Daighar police arrests two
अनैसर्गिक कृत्यास विरोध केल्याने मुलाची हत्या, शीळ डायघर पोलिसांनी केली दोघांना अटक
Mangal Budh Yuti
एप्रिलमध्ये ‘या’ राशींना मिळणार प्रचंड पैसा? १८ महिन्यानंतर २ ग्रहांची युती होताच नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

शनी देव हे मुळातच कुंभ राशीत स्थित असल्याने व त्यांचा उदय सुद्धा याच राशीत होणार असल्याने कुंभ राशीला ३६ दिवसांनी पुन्हा लाभ अनुभवता येऊ शकतो. कुंभ राशीत शनीदेव लग्न स्थानी स्थित असणार आहेत. यामुळे आपल्याला व्यक्तिमत्वात बदल आढळून येऊ शकतात. आपला स्वभाव बदलल्याने आजवर न सुटणारे प्रश्न मार्गीलागतील . शनी आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत शश महापुरुष योग निर्माण होत आहे. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास बाळगा जेणेकरून तुमचं मत गृहीत धरण्याऐवजी विचारात घेतलं जाईल. गुंतवणुकीच्या रूपात धनलाभ होऊ शकतो शिवाय पगारवाढीचे सुद्धा योग आहेत.

हे ही वाचा<< ३० दिवस शनीच्या राशीत सूर्य चमकणार, ‘या’ ३ राशी होतील मालामाल, तर ‘दोन’ राशींनी ओळखा धोक्याची घंटा

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

शनी देव उदय होण्याच्या आधीच वृषभ राशीच्या कामाच्या व प्रेमाच्या विषयांमध्ये काही प्रमाणात हालचाल सुरु होऊ शकते. याचे मुख्य कारण म्हणजे शनी उदय होण्याआधीच शुक्र देव आपल्या कर्म भावात गोचर करून विराजमान होणार आहेत. कामाच्या ठिकाणी विशेषतः तुमचा स्वतःचा व्यवसाय असेल तर प्रचंड मोठा धनलाभ संभवतो. नवीन संपर्क जोडता येतील ज्याच्यामुळे भविष्यात सुद्धा आर्थिक फायदे होऊ शकतात. गुंतवणुकीचा उत्तम परतावा मिळू शकतो. नोकरदारांना आपल्या वाणीवर काम करण्याची गरज आहे. बेरोजगारांना कामाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, फसवणुकीचा धोका टाळण्याचा प्रयत्न करा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)