Shani Nakshatra Parivartan 2026 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्म फलदाता आणि न्यायाची देवता मानले जाते. शनिदेव जेव्हा जेव्हा आपली चाल किंवा नक्षत्र बदलतात, तेव्हा त्याचा मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार, ९ ऑक्टोबर २०२६ रोजी शनिदेवांचे मोठे नक्षत्र गोचर होणार असून, ते पूर्वा भाद्रपद नक्षत्रातून उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करतील.

उत्तर भाद्रपद नक्षत्राचे स्वामी स्वतः शनिदेव आहेत. जेव्हा एखादा ग्रह स्वतःच्याच नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याची शुभता आणि प्रभाव अनेक पटींनी वाढतो. शनिदेवांचे हे नक्षत्र गोचर केवळ अध्यात्माच्या दृष्टीनेच नव्हे, तर व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि कौटुंबिक आयुष्यावरही मोठा सकारात्मक प्रभाव टाकेल.

१. वृषभ (Taurus)

शनिदेवांचे हे गोचर वृषभ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ परिणाम घेऊन येईल. तुमची अडकलेली कामे आता वेग घेतील. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती आणि पगारवाढीची दाट शक्यता आहे. जर तुम्ही बऱ्याच काळापासून नवीन व्यवसायाची योजना आखत असाल, तर गुंतवणुकीसाठी हा काळ अत्यंत अनुकूल सिद्ध होऊ शकतो.

२. मकर (Capricorn)

स्वतः शनिदेव मकर राशीचे स्वामी आहेत. उत्तर भाद्रपद नक्षत्रात प्रवेश केल्यामुळे मकर राशीच्या लोकांना मानसिक तणावापासून मोठा दिलासा मिळेल. जुन्या आजारांतून सुटका होईल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. परदेशात जाण्याचे किंवा नवीन मालमत्ता/संपत्ती खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

३. कुंभ (Aquarius)

शनीचे हे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीसाठी सकारात्मक ऊर्जा घेऊन येईल. समाजात मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कष्टाचे कौतुक होईल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होईल आणि साठवलेल्या धनात वाढ होईल.

४. मीन (Pisces)

शनिदेवांचे नक्षत्र परिवर्तन मीन राशीच्या लोकांसाठी सुख आणि शांती घेऊन येऊ शकते. तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण येऊ शकतात. तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळतील. जर तुम्ही बाहेरगावी किंवा परदेशी जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रगतीचे आणि उन्नतीचे योग जुळून येतील.

(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)