Shani Vakri 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा न्यायप्रिय ग्रह आहे जो कर्मानुसार फळ देतो. २९ जून २०२४ रोजी शनि उलट चाल चालणार आहे म्हणजेच वक्री होणार आहे. अशात चार राशींना लाभ होणार आहे परंतु किती लाभ होईल, हे या गोष्टीवर अवलंबून राहीन की व्यक्तीचे कर्म कसे आहेत. म्हणजेच कोणी चुकीचे काम करत नाही आणि नियमांचे पालन करत असेल तर शनिची वक्री चाल या राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. या राशी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात.

मेष

मेष राशीच्या अकराव्या स्थानी शनि वक्री होत आहे. ज्यामुळे करीअर आणि नोकरीमध्ये या लोकांची प्रगती होऊ शकते. जर तु्म्ही व्यवसाय करत आहात तर तुम्हाला व्यवसायात लाभ दिसून येईल. थांबलेली कामे मार्गी लागतील. आरोग्य उत्तम राहीन आणि नात्यात गोडवा जाणवेल पण पैसा खर्च करताना काळजी घ्यावी.

हेही वाचा : ‘या’ मूलांकच्या लोकांवर असते नेहमी लक्ष्मीची कृपा, यांना मिळते आयुष्यात धनसंपत्ती अन् बक्कळ पैसा

वृषभ

वृषभ राशीच्या १० व्या स्थानावर शनि वक्री होणार आहे. यामुळे या राशीचे लोक ज्या क्षेत्रात काम करत आहेत, तिथे त्यांना यश मिळेल. कदाचित होऊ शकते की या लोकांवर कामाचा दबाव असेल पण जर यांनी यावेळी मेहनत घेतली तर भविष्यात त्यांना फायदा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी त्यांच्या शत्रुंपासून सावध राहावे. एक चांगली डील मिळाली तर या लोकांना यश मिळू शकते.

कर्क

शनि कर्क राशीच्या आठव्या स्थानावर वक्री करणार आहे. अशात या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरी करताना अचानक पदोन्नती मिळू शकते. ज्या ठिकाणी हे लोक काम करतात, तिथे त्यांना अडचणी येऊ शकतात, अशात काळजी घेणे आवश्यक आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांनी मेहनत घेणे गरजेचे आहे.

हेही वाचा : सूर्याचे गोचर होताच निर्माण होईल शक्तिशाली ‘मालिका राजयोग’, ‘या’ राशींचे उजळेल भाग्य, पदोन्नतीबरोबर प्रत्येक कामात मिळेल यश

मकर

शनि मकर राशीच्या दुसऱ्या स्थानावर वक्री करणार आहे. ज्यामुळे करिअरच्या दृष्टीकोनातून हे लोक भाग्यवान दिसून येईल. फक्त या लोकांनी बोलताना विचारपूर्वक बोलावे. यांच्या वाणीमुळे या लोकांना कदाचित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. जर या लोकांची वाणी उत्तम असेल तर शनिची वक्री या लोकांना श्रीमंत बनवू शकते. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन आणि नात्यांमध्ये गोडवा दिसून येईन

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)