Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनि हा क्रूर आणि पापी ग्रह मानला जातो. याशिवाय त्याला कर्मफळदाता देखील म्हटले जाते. कारण तो प्रत्येक राशींच्या लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनिला शिस्त, व्यावहारिकता, रचना, कायदा आणि सामाजिक न्यायाचा कारक मानले जाते. त्यामुळे शनीच्या राशी किंवा नक्षत्र बदलामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होत असतो. अशात शनिदेव सुमारे ३० वर्षांनी मीन राशीत प्रवेश करतील आणि २०२७ पर्यंत ते या राशीत भ्रमण करतील. अशा परिस्थितीत काही राशींना मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. त्यांना नोकरीसह वैवाहिक जीवनातही बरेच फायदे मिळतील.
शनि १३ जुलै २०२५ रोजी ९ वाजून ३६ मिनिटांनी मीन राशीत वक्री होईल आणि सुमारे १३८ दिवस वक्री स्थितीत राहील. यानंतर २८ नोव्हेंबर रोजी तो मार्गी होईल. शनीची वक्री गती काही राशींसाठी फायदेशीर असू शकते, परंतु काही राशींच्या जीवनात त्यामुळे अधिक समस्या निर्माण होऊ शकतात.
कन्या (Virgo)
कन्या राशीच्या लोकांना शनीचे वक्री होणं फायदेशीर ठरु शकते. या काळात त्यांना खूप आर्थिक फायदे मिळू शकतात. नोकरीच्या अनेक संधी मिळू शकतात. व्यवसायात मोठा नफा होऊ शकतो तसेच संपत्तीतही वाढ होऊ शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायात तुम्हाला नफा मिळू शकेल. नोकरदारांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळू शकते. लव्ह लाईफमध्ये आनंदाचे क्षण येतील. काहींच्या नात्याचे लग्नात रूपांतर होऊ शकते. शिक्षण क्षेत्रातही तुम्हाला फायदा होऊ शकतो. मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. नवीन वाहन आणि घर खरेदीसाठी हा उत्तम काळ आहे.
मकर (Capricorn)
मकर राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल अनुकूल ठरू शकते. या काळात मकर राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. नोकरदारांना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. या राशीला साडेसतीपासूनही आराम मिळू शकतो. संवाद कौशल्य, धैर्य आणि नेटवर्किंग क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना मोठे फायदे मिळू शकतात. तुमच्या बोलण्याचा खूप मोठा परिणाम होईल. संवाद कौशल्य सुधारून तुम्ही अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. तुम्हाला लहान भाऊ, बहिणी आणि जवळच्या मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. यासह तुम्हाला प्रवासातून चांगला नफा कमवता येऊ शकतो. नात्यांमध्ये सुरू असलेल्या समस्याही कमी होऊ शकतात.
मीन (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी शनीची वक्री चाल फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांच्या जीवनात अनुकूल परिणाम दिसून येतील. तुमचे आरोग्य चांगले राहणार आहे. तुम्ही आत्मचिंतन करतानाही दिसून येते. सामाजिक जीवनात अधिक सक्रिय राहू शकता. तुम्ही अशा लोकांच्या संपर्कात येऊ शकता ज्यांच्यामुळे तुमची आर्थिक परिस्थितीही चांगली राहू शकते. परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. करिअरमध्येही यश मिळण्याची शक्यता खूप जास्त आहे. संयमाने केलेल्या कामात यश मिळू शकते.