Shani Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये शनिला विशेष महत्त्व आहे. शनिला कर्म आणि न्याय देवता सुद्धा म्हणतात. विशेष म्हणजे शनिविषयी लोकांच्या मनात भीती असते की शनिची स्थिती बदलल्याने आपल्यासाठी आणखी त्रासदायक ठरू शकते. पण ही भीती दूर करा कारण जर कोणत्याही व्यक्तीवर शनिची कृपा असेल गरीबाला श्रीमंत बनवू शकतो.

शनि या वेळी मीन राशीमध्ये विराजमान आहे आणि १३ जुलैला या राशीमध्ये वक्री होणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या मते, शनिच्या वक्री अवस्थेमध्ये शनि खूप जास्त पावर फूल होतो. तो लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनि मीन राशीमध्ये वक्री होणार आहे. त्यामुळे काही राशींना मोठा लाभ मिळू शकत. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत?

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, न्याय देवत १३ जुलै २०२५ रोजी सकाळी ७ वाजून २४ मिनिटांनी मीन राशीमध्ये वक्री करणार आहे आणि २८ नोव्हेंबर २०२५ रोजी मार्गी होणार आहे. शनि जवळपास १३८ दिवस उलट चाल चालणार आहे.

वृषभ राशी (Vrishabha Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिचे वक्री होणे लाभदायक ठरू शकते. एकादश भावामध्ये शनिचे वक्री होणे जीवनात चांगला प्रभाव दिसून येईल. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीची चांगली संधी मिळू शकते. वरिष्ठांच्या सहकार्याने या लोकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच पगार सुद्धा वाढू शकतो.

या लोकांना व्यवसायात मोठे यश मिळू शकते. कामाच्या बाबतीत या लोकांना दूरचा प्रवास करावा लागू शकतो. पण त्यामुळे त्यांना मोठा लाभ दिसून येईल. दीर्घ काळापासून अडकलेले धन पैसा परत मिळेल. अडकलेले कामे पूर्ण होतील. जीवनात सुख शांती दिसून येईल.

कन्या राशी (Kanya Zodiac)

या राशीमध्ये शनि सातव्या भावामध्ये वक्री होणार आहे. या राशीच्या लोकांसाठी शनिची उलट चाल अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कौटुंबिक जीवन सुखमय होऊ शकते. मशिनरी व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो. दीर्घकाळच्या गुंतवणुकीपासून चांगला लाभ मिळू शकतो.
तसेच विदेशात व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात सुख लाभेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकणार. तसेच जीवनात सुख शांती आणि धन संपत्ती लाभेल.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

या राशीमध्ये शनि देव दहाव्या भावात वक्री करणार आहे. अशात या राशीच्या लोकांना कार्य क्षेत्रामध्ये चांगली करता येईल. जोडीदाराबरोबरचे संबंध आणखी दृढ होईल. तसेच व्यवसायात या लोकांना योग्य रणनीती बनवून स्वत:ला सिद्ध करता येईल. या लोकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात.
नशीबाची पूर्ण साथ मिळेल. ज्यामुळे अनेक क्षेत्रामध्ये यश मिळू शकते. करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. हे लोक धन जमा करण्यात यशस्वी होतील. घर, संपत्ती खरेदी करण्याचे या लोकांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. याशिवाय सरकारकडून लाभ मिळू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)