Shani Vakri 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये ‘वक्र’ या शब्दाचा अर्थ ‘उलट गती’ असा होतो. जेव्हा एखादा ग्रह वक्री असतो, तेव्हा तो आकाशात मागे सरकताना दिसतो. शनी देवाच्या बाबतीत याचा प्रभाव गहन आणि महत्त्वपूर्ण मानला जातो.

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि देवांना कर्माचे फळ देणारे आणि न्यायाची देवता मानले जाते. जेव्हा जेव्हा मार्गक्रमण बदलतात, तेव्हा त्याचा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर परिणाम होतो. २०२६मध्ये एक मोठी ज्योतिषीय घटना जुलै २०२६ रोजी शनि देव आपले मार्गक्रमण बदलून मीन राशीत वक्री होतील. वक्री म्हणजे ते उलट दिशेने फिरतील. शनिदेवांची ही स्थिती ११ डिसेंबर २०२६पर्यंत एकूण १३८ दिवस टिकेल. ज्योतिषांच्या मते, चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधीच्या या काळात तीन राशींचे भाग्य उजळून निघेल. त्यांच्यासाठी एक सुवर्णकाळ येईल, त्यात त्यांना धन, सुख आणि यश प्राप्त होईल.

तूळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी शनीची ही वक्री गती चमत्कारापेक्षा कमी नसेल. जर तुम्ही तुमच्या नोकरी किंवा व्यवसायात दीर्घकाळापासून अडचणींचा सामना करत असाल, तर ते अडथळे आता आपोआप दूर होतील. तुमच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्त्रोत असतील. तुमच्या बँकेतील ठेवी वाढतील.

वृश्चिक राशी

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे १३८ दिवस खूप सुखद असतील. तुम्हाला कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात एखादा मोठा प्रकल्प किंवा संधी मिळू शकते. जे परदेशात शिक्षण घेऊ इच्छितात किंवा नोकरीच्या शोधात आहेत, त्यांच्यासाठी हा काळ शुभ आहे.

मकर राशी

मकर राशीवर स्वत: भगवा शनिदेवांचे अधिपत्य आहे. त्यामुळे या राशीला त्यांचा विशेष आशीर्वाद लाभेल. तुम्ही हाती घेतलेल्या कोणथ्याही नवीन कार्यात यश निश्चित आहे. जर तुम्ही जमीन खरेदी करण्याचा किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर हे १३८ दिवस तुमच्यासाठी उत्कृष्ट ठरतील.

हा काळ विशेष का आहे?

याच काळात दिवाळी (८ नोव्हेंबर) आहे. हा काळ या राशींसाठी आर्थिकदृष्ट्या खूप फलदायी आणि आनंदी ठरेल.