Shani Vakri 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. या काळात तो नक्षत्र परिवर्तन, अस्त, वक्री आणि उदय स्थितीतही जातो. पंचांगानुसार, शनीदेव ०४ सप्टेंबर २०२६ रोजी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मीन राशीत वक्री होणार आहेत. शनीची ही वक्री चाल १२ पैकी काही राशींसाठी फायदेशीर ठरेल.
वक्री शनीचे गोचर ‘या’ राशींचे भाग्य बदलणार
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींना शनीची वक्री स्थिती अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल.
कर्क (Kark Rashi)
शनीची वक्री स्थिती कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल.
सिंह (Vruschik Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींना शनीची वक्री नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल.
वृश्चिक (Vruschik Rashi)
वृश्चिक राशीसाठी शनीची वक्री स्थिती या राशीच्या जातकांवर विशेष जाणवू शकतो. या काळात आर्थिक व्यवहार, नोकरी-व्यवसाय आणि वैयक्तिक नात्यांमध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता आहे. आधी केलेल्या कामातून किंवा जुन्या संपर्कातून पुन्हा एखादी संधी मिळू शकते. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. प्रेमसंबंधात जुने गैरसमज पुन्हा समोर येऊ शकतात.
कुंभ (Kumbha Rashi)
शनी वक्री असताना या राशीच्या जातकांना स्वतःच्या निर्णयांचा आणि नातेसंबंधांचा पुनर्विचार करण्याची संधी मिळू शकते. करिअरमध्ये काही जुन्या संधी पुन्हा समोर येऊ शकतात किंवा पूर्वी अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्याची वेळ येऊ शकते. आर्थिक बाबतीत अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता असल्याने बजेटकडे लक्ष द्यावे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात संवादाला विशेष महत्त्व राहील. जुने मित्र किंवा संपर्क पुन्हा आयुष्यात येऊ शकतात.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
