Shani Vakri 2026: ज्योतिषशास्त्रामध्ये शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. शनी नवग्रहातील ग्रहांमध्ये सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी शनीला जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनीने २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून ०१ मिनिटांनी कुंभ राशीतून मीन राशीमध्ये प्रवेश केला होता, जो पुढील अडीच वर्ष म्हणजे ३ जून २०२७ पर्यंत या राशीमध्ये राहील. दरम्यान, या काळात शनी नक्षत्र गोचर, नक्षत्र पद गोचर, अस्त, वक्री, मार्गी आणि उदित स्थितीतही प्रवेश करतो. जुलैमध्ये शनीदेव वक्री झाले असून १० डिसेंबरपर्यंत शनीदेवाची ही स्थिती अशीच राहील. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या लोकांवर पाहायला मिळेल.

शनीदेव ‘या’ राशींचे भाग्य बदलणार

वृषभ (Vrushabh Rashi)

वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी देखील शनीची वक्री स्थिती खूप खास असेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.
उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.

कर्क (Kark Rashi)

शनीची वक्री स्थिती कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.

कन्या (Kanya Rashi)

कर्क राशीच्या व्यक्तींना शनीच्या वक्री स्थितीमुळे अनेक चांगले फायदे होतील. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीसाठी शनीची वक्री स्थिती आत्मपरीक्षण, जबाबदाऱ्या आणि कामातील अडथळे यांचा काळ ठरू शकतो. रखडलेली कामे पुन्हा मार्गी लावण्याची संधी मिळेल, मात्र निर्णय घेताना घाई टाळणे महत्त्वाचे राहील. नोकरी-व्यवसायात अतिरिक्त जबाबदाऱ्या येऊ शकतात आणि मेहनतीचे फळ मिळण्यासाठी थोडा विलंब होऊ शकतो. आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. जुन्या समस्या पुन्हा समोर येऊ शकतात; त्यातून योग्य धडा घेतल्यास पुढील काळात प्रगतीचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)