Shani Vakri 2026 Impact on Zodiac Signs: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या राशीतील बदल आणि त्यांच्या चालीला विशेष महत्त्व दिले जाते. त्यातही शनी ग्रहाला कर्मफलाचा दाता मानले जात असल्याने त्याच्या प्रत्येक हालचालीकडे ज्योतिष अभ्यासकांचे लक्ष असते. यंदा २७ जुलै रोजी शनी मीन राशीत वक्री होणार असल्याचे ज्योतिषशास्त्रीय गणित सांगते. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत ३० जुलैपासून श्रावण महिना सुरू होणार आहे. त्यामुळे या दोन घटनांचा काही राशींच्या लोकांवर एकत्रित सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो, अशी ज्योतिषशास्त्रीय शक्यता व्यक्त केली जात आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार शनीच्या वक्री चालीचा प्रभाव सर्व १२ राशींच्या लोकांवर पडणार असला तरी सहा राशींच्या व्यक्तींसाठी हा काळ तुलनेने अधिक अनुकूल ठरू शकतो. अर्थात, हे सर्व अंदाज केवळ ज्योतिषशास्त्रीय गणनांवर आधारित असून, त्याकडे श्रद्धा आणि वैयक्तिक विश्वासाच्या दृष्टीनेच पाहावे.

मेष

या काळात मेष राशीच्या व्यक्तींची अनेक रखडलेली कामे मार्गी लागू शकतात. आर्थिक अडचणी हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. धनलाभ होऊ शकतो, नवीन उत्पन्नाचे मार्ग खुलू शकतात, व्यवसायात नफा होऊ शकतो आणि नोकरीत चांगली कामगिरी केल्यामुळे वरिष्ठांकडून त्यांचे कौतुक होऊ शकते. काही महत्त्वाचे व्यवहार यशस्वी होण्याची शक्यता असून, समाजात मान-सन्मान वाढू शकतो. वैवाहिक जीवनातही गैरसमज दूर होऊन, नातेसंबंध अधिक दृढ होण्याची शक्यता आहे.

मिथुन

या काळात मिथुन राशीच्या व्यक्तींमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीची संधी मिळू शकते, करिअरमध्ये प्रगती होऊ शकते, धनलाभाची शक्यता आहे आणि महत्त्वाच्या व्यक्तींची साथ लाभू शकते. व्यावसायिक प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहण्याची शक्यता असून, कुटुंबासोबत समाधानाचे क्षण अनुभवता येऊ शकतात.

कर्क

हा काळ कर्क राशीच्या व्यक्तींसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो, असे ज्योतिषशास्त्र सांगते. व्यवसायात मोठ्या संधी मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात, नवीन आर्थिक व्यवहार फायदेशीर ठरू शकतात आणि नोकरीत प्रतिष्ठा वाढू शकते. बेरोजगारांना नवीन नोकरीची संधी मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांचे सहकार्य लाभल्याने अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होऊ शकतात. मित्रांची साथ मिळाल्यामुळे अडथळे कमी होण्याची शक्यता आहे.

धनू

या कालावधीत धनू राशीच्या व्यक्तींना नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. धनलाभ होऊ शकतो, व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो, नवीन प्रकल्पांमध्ये यश मिळू शकते आणि विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल, तर काही सकारात्मक घडामोडी घडू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहू शकते आणि प्रवासाचे योगही जुळून येऊ शकतात.

मकर

शनी महाराजांची वक्री चाल मकर राशीच्या व्यक्तींसाठी शुभ संकेत देणारी ठरू शकते. अडकलेला पैसा मिळू शकतो, करिअरमधील अडथळे दूर होऊ शकतात, पदोन्नतीची शक्यता निर्माण होऊ शकते आणि समाजात मान-सन्मान वाढू शकतो. एखादा जुना वाद मिटू शकतो. प्रभावशाली व्यक्तींशी ओळखी वाढू शकतात, ज्याचा भविष्यात फायदा होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळाल्यामुळे कामाचा वेग वाढू शकतो.

मीन

शनी महाराज आपल्या राशीतच वक्री होत असल्यामुळे मीन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ उत्साहवर्धक ठरू शकतो. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे, व्यवसायात नफा मिळू शकतो, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे आणि कुटुंबात आनंददायी वातावरण निर्माण होऊ शकते. धार्मिक कार्यांमध्ये मन रमू शकते. मानसिक ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाचे निर्णय भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराजांची वक्री चाल काही राशींसाठी सकारात्मक संधी घेऊन येऊ शकते. मात्र, हे सर्व अंदाज केवळ ज्योतिषशास्त्रीय शक्यतांवर आधारित आहेत. प्रत्यक्ष परिणाम प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली, दशा आणि इतर ग्रहस्थिती यांनुसार वेगवेगळे असू शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)