Shani Vakri: वैदिक ज्योतिषानुसार शनीला कर्मफळ देणारा आणि न्यायाचा देव मानले जाते. शनीच्या चालीत होणारा प्रत्येक बदल सर्व राशींवर परिणाम करणारा मानला जातो. ऑक्टोबर २०२६ मध्येही शनी मीन राशीत वक्री अवस्थेत राहणार आहे. या काळात ३ राशींच्या लोकांनी आर्थिक बाबी, करिअर आणि कौटुंबिक विषयांमध्ये विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. जाणून घ्या कोणत्या आहेत त्या राशी आणि कोणत्या बाबतीत त्यांनी सावध राहावे. तसेच बुधाच्या वक्री चालीमुळेही काही राशींसमोर अडचणी वाढू शकतात.
शनी किती दिवस वक्री राहणार?
ज्योतिषशास्त्रानुसार, शनी २६ जुलै २०२६ रोजी वक्री झाला असून तो ११ डिसेंबर २०२६ रोजी मार्गी होणार आहे. म्हणजेच शनी तब्बल १३८ दिवस वक्री अवस्थेत राहणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिनाभरही शनीच्या वक्री चालीचा प्रभाव कायम राहील. ज्योतिषशास्त्रात वक्री म्हणजे एखादा ग्रह पृथ्वीवरून पाहताना मागे सरकत असल्यासारखा दिसणे.
सिंह राशी (Leo Horoscope)
या राशीच्या लोकांनी ऑक्टोबरमध्ये आरोग्य आणि महत्त्वाचे निर्णय घेताना विशेष काळजी घ्यावी. घाईघाईत मोठे आर्थिक निर्णय घेणे टाळा. कुटुंबात एखाद्या कारणावरून वाद होऊ शकतो, त्यामुळे बोलताना संयम ठेवणे आवश्यक आहे. नोकरीत काही अडचणी येऊ शकतात, त्यामुळे शांतपणे आणि संयमाने काम करणे फायद्याचे ठरेल.
मकर राशी (Capricorn Horoscope)
मकर राशीचा स्वामी शनी ग्रह आहे. त्यामुळे या काळात आर्थिक व्यवहार करताना अधिक सावध राहण्याची गरज आहे. जुने कर्ज किंवा गुंतवणुकीशी संबंधित निर्णय विचारपूर्वक घ्या. वाढत्या खर्चामुळे बजेट बिघडू शकते. कामाच्या ठिकाणी मेहनत करूनही अपेक्षित यश मिळण्यास थोडा विलंब होऊ शकतो.
कर्क राशी (Cancer Horoscope)
कर्क राशीच्या लोकांना नातेसंबंध आणि करिअरमध्ये चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. अचानक मिळणाऱ्या पैशांबाबत घाईघाईत निर्णय घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांवर राग काढणे टाळा आणि आत्मविश्वास कायम ठेवा. एखाद्या जवळच्या व्यक्तीची नाराजी मानसिक तणावाचे कारण ठरू शकते.
शनीसाठी करा हे उपाय
शनीच्या वक्री काळात शनिवार आणि मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करणे शुभ मानले जाते. शनिवारी तिळाचे तेल, काळी उडीद, काळे कपडे आणि जव यांचे दान करावे. गरजू लोकांची निःस्वार्थपणे सेवा करावी. तसेच शनिवार आणि मंगळवारी हनुमानाची पूजा करावी. शनिदेवाच्या बीज मंत्राचा जप आणि शनी स्तोत्राचे पठण करणेही शुभ मानले जाते.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
