Shani Nakshatra Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तसेच वेळोवेळी तो नक्षत्र परिवर्तनही करतो.

पंचांगानुसार, शनीदेव सध्या उत्तराभाद्रपद नक्षत्रामध्ये विराजमान असून १७ मे २०२६ रोजी दुपारी ०३ वाजून ४९ मिनिटांनी रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. शनीचे हे दुसरे नक्षत्र परिवर्तन असेल. हे नक्षत्र परिवर्तन १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल.

नक्षत्र परिवर्तन म्हणजे काय?

ज्योतिषशास्त्रातील २७ नक्षत्रांमध्ये १२ राशी विभागल्या गेल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे ग्रह राशी परिवर्तन करतात त्याप्रमाणे नक्षत्र परिवर्तनही करतात. राशी परिवर्तनाइतकेच नक्षत्र परिवर्तनही खूप प्रभावी आणि खास मानले जाते. ज्योतिषशास्त्रात पुष्य, अनुराधा आणि उत्तराभाद्रपद या नक्षत्रांचा स्वामी शनी आहे.

शनीचे नक्षत्र परिवर्तन मालामाल करणार

मीन (Meen Rashi)

शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश मीन राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींना शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींना शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल.

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनीचे नक्षत्र गोचर खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)