Shanidev Vakri 2025: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतात. तसेच याव्यतिरिक्त ग्रह वक्री आणि मार्गी देखील होतात. ज्योतिषशास्त्रानुसार, शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे, जो एका राशीत किमान अडीच वर्षं राहतो. १२ राशींचे संपूर्ण राशीचक्र पूर्ण करण्यासाठी त्याला साधारण ३० वर्षांचा कालावधी लागतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, शनीने २९ मार्च २०२५ रोजी मीन राशीत प्रवेश केला असून तो १३ जुलै २०२५ पासून वक्री होणार आहे. शनीची ही वक्री अवस्था काही राशींसाठी लाभदायी तर काही राशींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल.
शनी करणार ‘या’ तीन राशींची चांदी
कर्क (Kark Rashi)
शनीचे कुंभ राशीतील गोचर मकर राशीच्या व्यक्तींसाठी देखील खूप खास असेल. प्रत्येक कामात यश मिळेल. या काळात अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल, आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत मिळतील.
मकर (Makar Rashi)
शनीचे कुंभ राशीतील गोचर पुढील दिवस कुंभ राशीच्या व्यक्तींना फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल.
कुंभ (Kumbha Rashi)
पुढील ४७ दिवस शनीचे कुंभ राशीतील गोचर वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सकारात्मक इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)