Shani Vakri 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. या कालावधीत तो नक्षत्र परिवर्तन, वक्री, मार्गी, अस्त या स्थितीतही जातो.
पंचांगानुसार, २७ जुलै २०२६ रोजी मध्यरात्री ०१ वाजून २५ मिनिटांनी वक्री होणार असून ११ डिसेंबर २०२६ रोजी पहाटे ०५ वाजता होईल. या संपूर्ण १३८ च्या वक्री अवस्थेत शनी मीन राशीतच उपस्थित असेल, दरम्यान, २०२६ च्या मार्गी झालेला शनी नक्कीच १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक सिद्ध होईल.
वक्री शनी ‘या’ राशींचे नशीब बदलणार
मकर (Makar Rashi)
मकर राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री अवस्था अत्यंत लाभदायी ठरेल. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल.
मीन (Meen Rashi)
शनीची वक्री अवस्था मीन राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. आरोग्य चांगले राहील. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल.
सिंह (Singh Rashi)
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री अवस्था खूप सकारात्मक फळ देणारा ठरणार आहे. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.
मेष (Mesh Rashi)
मेष राशीच्या व्यक्तींसाठी शनीची वक्री स्थिती सकारात्मक फळ मिळवून देणारी असेल. नशीब तुमच्या बाजूने असेल, प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. अविवाहितांचे लग्न जुळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल. आरोग्य उत्तम राहील. नवीन गाडी, घर किंवा जमीन खरेदी कराल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. बँक बॅलन्समध्ये घसघशीत वाढ होईल.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
