Shatabhisha Nakshatra Rahu Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, राहू गोचर होताच काही राशींच्या लोकांच्या संपत्ती आणि प्रसिद्धीमध्ये अचानक मोठी वाढ होऊ शकते. राहूचा राशिबदल किंवा नक्षत्र परिवर्तनाने सर्व १२ राशींच्या लोकांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या परिणाम होत असतो. राहू ३१ मे २०२६ रोजी पहाटे २ वाजून २८ मिनिटांनी शताभिषा नक्षत्रात प्रवेश करील. राहूच्या या बदलामुळे १२ पैकी चार राशींच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. चला जाणून घेऊया कोणत्या राशीला याचा फायदा होईल. मिथुन राहूच्या स्थितीत झालेल्या बदलामुळे मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल काळ येईल. त्यांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. खर्च कमी होतील आणि त्यांचे आरोग्य सुधारेल. करिअरमध्ये यश मिळू शकते. व्यवसायातील गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परदेश प्रवासाच्या योजना यशस्वी होऊ शकतात. न्यायालयीन प्रकरणांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कन्या शतभिषा नक्षत्रातील कन्या राशीसाठी राहू गोचर फायदेशीर ठरू शकते. त्यांना व्यवसायात नफा होईल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबातील सदस्यांमधील त्रास दूर होईल. प्रलंबित कामे पूर्ण होतील आणि मानसिक ताण कमी होईल. आरोग्य सुधारेल, तुमच्या जोडीदाराबरोबर सुरू असलेले गैरसमज दूर होतील. हेही वाचासाडेसातीची भीती संपली! शनी अस्ताला जाताच ‘या’ राशींच्या लोकांसाठी श्रीमंतीचे मार्ग होणार खुले; पालटणार नशीबही मकर राहूचे गोचर मकर राशीच्या लोकांसाठी शुभ ठरेल. त्यांच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ शकते. उत्पन्न वाढेल, ज्यामुळे त्यांना कर्ज फेडता येईल. दीर्घकाळापासूनच्या इच्छा पूर्ण होतील. अतिरिक्त उत्पन्नाचे मार्गही खुले होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. कुंभ शतभिषा नक्षत्रातील राहूचे गोचर कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक ठरू शकते. त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि नोकरी करणाऱ्यांना पगार वाढू शकेल. त्यांच्या कामाचे कौतुक होईल आणि त्यांना पदोन्नती मिळू शकेल. भागीदारीत व्यवसाय केल्याने लक्षणीय नफा मिळू शकेल. अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी करता येईल.