Shravan 2024: हिंदू धर्मात श्रावण महिन्याला खूप पवित्र आणि महत्त्वपूर्ण मानले जाते. श्रावण महिन्यात महादेवाची पूजा-आराधना मोठ्या प्रमाणात केली जाते. ५ ऑगस्टपासून श्रावणाला सुरुवात झाली असून तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच १९ ऑगस्ट रोजी अनेक शुभ संयोग निर्माण होणार आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारी नारळी पौर्णिमा (रक्षाबंधन) देखील असणार आहे. या शुभदिनी सर्वार्थ सिद्धी योग, शोभन योग, रवि योग आणि श्रवण नक्षत्राचा दुर्लभ संयोग निर्माण होत आहे. हा दुर्लभ संयोग जवळपास ९० वर्षांनंतर निर्माण होणार असून याच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील.
तिसरा श्रावणी सोमवारी तीन राशींसाठी खास (Shravan 2024)
मेष
श्रावणातला तिसरा सोमवार मेष राशीच्या व्यक्तींसाठी अनेक सकारात्मक बदल घडवून आणणारा असेल. या दिवशी भाग्याची तुम्हाला साथ मिळेल. कर्जमुक्ती होईल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य चांगले राहील. भावंडांबरोबरचे संबंध चांगले होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. आयुष्यात अचानक आनंद येईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना तिसरा श्रावणी सोमवार खूप लाभदायी सिद्ध होईल. करिअरमध्ये हवे तसे यश मिळेल. अडकलेले पैसे परत मिळतील. आरोग्य चांगले राहील. प्रेमसंबंध चांगले होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. सौभाग्य वृद्धी होईल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. आयुष्यात अचानक आनंद येईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. मनातील इच्छा पूर्ण होतील.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींनादेखील श्रावणातील तिसरा सोमवार खूप शुभ परिणामकारक असेल. या काळात तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. आकस्मिक धनप्राप्ती होईल. या काळात नव्या नोकरीची ऑफर मिळेल. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. आध्यात्मिक कार्यात मन रमेल. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. भाग्याची साथ मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. कामाच्या ठिकाणी खूप कौतुक होईल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.
(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
© IE Online Media Services (P) Ltd