Shani Budh Rahu Ketu Grah Vakri 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जुलैमध्ये एक दुर्मिळ योग घडून येत आहेत. यादरम्यान ४ ग्रह वक्री होत आहेत. यात १३ जुलै रोजी शनि वक्री होणार आहे. तसेच बुध १७ जुलै रोजी वक्री होईल. तर राहू आणि केतु आधीच वक्री झाले आहेत. ४ ग्रह एकाचवेळी वक्री होण्याचा हा योग ७२ वर्षांनी जुळून आला आहे. ज्यामुळे काही राशींचे भाग्य चमकू शकते. तसेच या राशींना नोकरीत पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते.

कर्क ( Cancer Zodiac Sign)

४ ग्रहांची वक्र चाल कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. अविवाहित लोकांना लग्नाची मागणी येऊ शकते. तसेच, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन उंची गाठण्याची ही वेळ आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि संवाद कौशल्य सुधारेल. तुम्ही पैसे वाचवण्यात देखील यशस्वी व्हाल. तसेच तुमच्या इच्छा पूर्ण होतील.

वृषभ ( Taurus Zodiac Sign)

वृषभ राशीच्या लोकांसाठी ग्रहांची वक्री हालचाल सकारात्मक ठरू शकते. या काळात तुमचे उत्पन्न वाढू शकते. तसेच नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. तुमचे संबंध सुधारण्यासाठी आणि नवीन नाती जोडण्यासाठी हा काळ अनुकूल असेल. व्यवसाय भागीदारीत नफा होईल आणि वैवाहिक जीवन चांगले होईल. त्याच वेळी तुम्ही यावेळी समाजात अधिक लोकप्रिय व्हाल. तुम्हाला आदर आणि प्रतिष्ठा मिळेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मीन ( Pisces Zodiac Sign)

मीन राशीच्या लोकांसाठी ४ ग्रहांची वक्री चाल सकारात्मक ठरू शकते. या काळात तुम्ही कर्जातून मुक्त होऊ शकता. नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा गुंतवणूक करण्यासाठी हा अनुकूल काळ आहे. प्रेमसंबंधात गोड येईल आणि अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. व्यवसाय विस्तारेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात. बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते. नोकरदरांना पदोन्नती आणि नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात यश मिळू शकते.