Horoscope Today 13 August 2026 In Marathi : आज १३ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील श्रावण महिन्यातील प्रतिपदा तिथी रात्री ८ वाजून ४२ मिनिटांपर्यंत असणार आहे. सकाळी ६ वाजून ७ मिनिटांपर्यंत आश्लेषा नक्षत्र जागृत होईल आणि दुपारी १२ वाजून १४ मिनिटांपर्यंत वरियन योग जुळून येणार आहे. राहू काळ १ वाजून ५८ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ३७ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज अभिजात मुहूर्त ११ वाजून ५९ मिनिटांपासून सुरु होईल ते १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत राहील. आजपासून श्रावणाला सुरुवात झाली आहे. कोणावर राहील महादेवाची कृपा चला जाणून घेऊयात…

आजचे पंचांग व राशिभविष्य, ११ ऑगस्ट २०२६ (Dainik Rashi Bhavishya 11 August 2026 In Marathi)

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

मानसिक दडपण कमी होईल. जोडीदाराचा वरचष्मा राहील. काही तडजोडी कराव्या लागतील. भौतिक सुखाला फार महत्त्व राहणार नाही. मान-सन्मानात वाढ होईल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

जुनी कामे पूर्ण कराल. कौटुंबिक खर्चाला आवर घालावी लागेल. मानसिक स्थैर्य लाभेल. बदलाच्या योजना अनुकूल ठरतील. कौटुंबिक गैरसमज मनातून काढून टाकावेत.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

समोरील प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. योजनाबद्ध कामे करावीत. घरातील प्रलंबित कामे उरकाल. मनाचा गोंधळ उडवून घेऊ नका. वरिष्ठांच्या होकारत होकार मिसळावा लागेल.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

जवळच्या व्यक्ति भेटतील. जवळच फेरफटका मारायला जाता येईल. जबाबदारीची जाणीव ठेवून वागावे. भावंडांकडून चांगल्या बातम्या मिळतील. सहकारी तुम्हाला चांगली मदत करतील.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

मनातील वाईट गोष्टींचा निचरा करा. सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा. सामाजिक प्रतिष्ठा जपावी. आवडी बाबत दक्ष राहाल. धाडस व पराक्रमात वाढ होईल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

इतर कोणाकडून मदतीची फार अपेक्षा करू नका. मानसिक अवस्था संतुलित ठेवा. आवडत्या कामांमध्ये वेळ घालवा. मानापमानाच्या प्रसंगांकडे दुर्लक्ष करावे. कले संदर्भात नवीन वाट चोखाळाल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

पूर्वी केलेली बचत मोलाची ठरेल. अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश राहील. विशाल दृष्टीकोन बाळगावा. मित्रांशी सलोख्याने वागावे. मनाची चंचलता जाणवेल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

प्रतिष्ठित लोकांशी ओळख वाढेल. कामाला नवीन चालना मिळेल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. मानसिक शांतता लाभेल. आर्थिक आघाडीवर दिवस चांगला जाईल.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

नवीन संधीकडे लक्ष ठेवावे. कामात चिकाटी ठेवावी लागेल. एखादी नवीन गोष्ट हाती लागू शकते. कुटुंबातील सदस्यांशी सलोखा ठेवावा. कौटुंबिक काळजी सतावत राहील.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

मनातील संभ्रम काढून टाकावेत. स्थावर विषयक कामे निघतील. हाताखालील लोक चांगले मिळतील. सहकारी वर्गाकडून मदतीची अपेक्षा बाळगू नका. एकावेळी अनेक कामे अंगावर घेऊ नका.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

कामे योग्य पद्धतीने मार्गी लागतील. कामातून समाधान लाभेल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. वाहन चालवताना सावधानता बाळगावी. मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवा.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

शांत राहून परिस्थितीचा आढावा घ्यावा. कुटुंबियांसोबत वेळ घालवावा, त्यातून मानसिक समाधान लाभेल. भागीदारीच्या कामातून चांगला लाभ होईल. बुद्धी चातुर्यावर कामे पार पाडाल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर