Shravan Zodiac Benefits: धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा मानला जातो. भगवान शिवांची आराधना, जलाभिषेक, उपवास आणि विविध धार्मिक विधींमुळे या महिन्याला विशेष स्थान आहे. धार्मिक मान्यतेनुसार, समुद्रमंथनातून बाहेर पडलेले विष भगवान शिवांनी आपल्या कंठात धारण केले आणि त्यानंतर त्यांना नीलकंठ म्हणून ओळख मिळाली, त्यामुळे श्रावण महिन्यात भगवान शिवांची भक्तिभावाने पूजा केल्यास मनोकामना पूर्ण होतात अशी श्रद्धा आहे.
यंदाचा श्रावण महिना अनेक शुभ योगांनी सुरू होत असल्याने ज्योतिषशास्त्रातही त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या मते, यंदा श्रावणात तब्बल ५३ वर्षांनंतर एक दुर्मीळ ग्रहसंयोग तयार होत आहे. आयुष्मान योगासह गुरू, शुक्र आणि चंद्र यांच्या संयोगातून त्रिग्रही योग निर्माण होणार असून, त्याच काळात शनी वक्री अवस्थेत राहणार आहेत; तर गुरू अस्त असतील. या सर्व ग्रहस्थितीचा काही राशींवर विशेष शुभ परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे या दुर्मीळ ग्रहसंयोगाचा सर्वाधिक लाभ चार राशींच्या व्यक्तींना मिळू शकतो, असे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. करिअर, आर्थिक प्रगती, कुटुंबातील आनंद आणि रखडलेली कामे मार्गी लागण्याची संधी या काळात निर्माण होऊ शकते.
मेष
मेष राशीच्या व्यक्तींसाठी श्रावण महिना अत्यंत लाभदायक ठरू शकतो. भगवान शिवांच्या कृपेने अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात; त्यामुळे पद, प्रतिष्ठा आणि मानसन्मानात वाढ होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठीही हा काळ फायदेशीर मानला जात असून, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळण्याचेही योग दिसून येत आहेत.
कर्क
कर्क राशीच्या व्यक्तींना श्रावण महिन्यात नशिबाची उत्तम साथ मिळू शकते. मानसिक ताण कमी होऊन मन प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. तसेच कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची साथ मिळाल्याने प्रगतीचा मार्ग अधिक सोपा होऊ शकतो.
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या अनुकूल ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून आर्थिक स्थिती अधिक मजबूत होऊ शकते. आत्मविश्वास वाढेल आणि समाजात तसेच कार्यक्षेत्रात तुमचा प्रभावही वाढू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ सकारात्मक मानला जात आहे. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या व्यक्तींवरही भगवान शिवांची विशेष कृपा राहू शकते, असे मानले जाते. पैतृक संपत्तीशी संबंधित प्रकरणांमध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद आणि समजूतदारपणा वाढू शकतो. आरोग्याच्या तक्रारी कमी होऊन प्रकृतीत सुधारणा जाणवू शकते, त्यामुळे हा महिना अनेक बाबतीत दिलासादायक ठरू शकतो.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)
