Daily Horoscope 7 September 2026 In Marathi : आज ७ सप्टेंबर २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी असणार आहे. संध्याकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत पुनर्वसु नक्षत्र जागृत होईल आणि रात्री ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत वरियन योग जुळून येणार आहे. राहू काळ ५ वाजून १६ मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. आजचा सोमवार खास असणार आहे. आज शेवटचा श्रावणी सोमवार आणि अजा एकादशी असणार आहे.

आजचे पंचांग व राशिभविष्य, ६ सप्टेंबर २०२६ (Dainik Rashi Bhavishya 7 September 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

आपल्या तेजस्वी व्यक्तिमत्वाची छाप पाडाल. जोडीदाराशी सुसंवाद घडेल. मुलांबद्दल चांगली बातमी मिळेल. कार्यक्षेत्रात काही बदल घडून येतील. आत्मसन्मान बाळगून वागा.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

बोलण्यात माधुर्य ठेवा. घरातील कामांना वेग येईल. व्यावसायिक गैरसमज टाळा. सामाजिक भान राखून वागावे. मानसिक शांतता लाभेल.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

आपल्या बोलण्याने लोक प्रभावित होतील. हरवलेली वस्तु सापडेल. जोडीदाराच्या कलेचे कौतुक कराल. दिनक्रम अतिशय व्यस्त राहील. भगवंताचे नामस्मरण करावे.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. मानसिक गोंधळ टाळावा. जोडीदाराच्या मतांचा आदर करावा. समस्येतून प्रयत्नाने मार्ग काढावा. निराश होऊ नका.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

गोष्टी मनासारख्या घडतील. मुलांशी सुसंवाद साधता येईल. गोड बोलून कार्यभाग साधावा. वाणीत माधुर्य ठेवावे. समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग सापडेल.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

उगाच नसत्या भानगडीत स्वत:ला गुंतवू नका. प्रेमातील गोष्टी लांबणीवर पडू शकतात. नोकरीत प्रशंसा होईल. मन विचलीत होऊ देऊ नका. वडीलधार्‍यांचा सल्ला मोलाचा ठरेल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

घरातील जुन्या कामात अडकून राहाल. अटीतटिचे वाद वाढवू नका. वाचनात वेळ घालवावा. प्रलंबित कामात मित्रांची मदत घ्याल. बचतीच्या योजना आखाल.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

घरातील जुन्या वस्तूंचा शोध घ्याल. व्यावसायिक कामात बदल जाणवेल. अभ्यासाचा कंटाळा करू नका. कामकाजात सुधारणा करण्याकडे लक्ष द्यावे. प्रलंबित कामांना प्राधान्य द्यावे.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

धार्मिक गोष्टींच्या सानिध्यात राहाल. जोडीदाराकडून अनपेक्षित लाभ मिळेल. धनवृद्धीचे संकेत मिळतील. स्वत:च्या हिंमतीवर मार्ग काढाल. भावंडांकडून शुभ वार्ता मिळेल.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

अचानक धनलाभाची शक्यता. गरम वस्तूंपासून दूर राहावे. प्रवासात योग्यती खबरदारी घ्यावी. निष्काळजीपणा नुकसान करू शकतो. भागीदारीत सतर्क राहावे.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

जुन्या गोष्टी मार्गी लागतील. ग्रहयोग वृद्धीकारक ठरेल. विरोधकांच्या कारवाया निष्प्रभ ठरतील. शिक्षण क्षेत्रात यश मिळेल. स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळेल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

घरासाठी मोठ्या वस्तूंची खरेदी कराल. मनातील इच्छा पूर्ण होईल. लहान आजारांकडे दुर्लक्ष करू नका. प्रयत्नांची कास सोडू नका. व्यापारी वर्गासाठी सामान्य दिवस.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर