Rashi Bhavishya 9 September 2026 In Marathi : आज ९ सप्टेंबर २०२६ रोजी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी दुपारी २ वाजून ४४ मिनिटांनी असणार आहे. संध्याकाळी ४ वाजून ४० मिनिटांपर्यंत अश्लेषा नक्षत्र जागृत होईल आणि रात्री ३ वाजून ३८ मिनिटांपर्यंत शिव योग जुळून येणार आहे. राहू काळ ५ वाजून १६ मिनिटांनी सुरु होईल ते ६ वाजून ५० मिनिटांपर्यंत असणार आहे. आज मासिक शिवरात्री असणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असणार जाणून घेऊयात.

आजचे पंचांग व राशिभविष्य, ८ सप्टेंबर २०२६ (Today Horoscope 8 September 2026 In Marathi )

दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)

प्रेमाच्या व्यक्तींशी गाठ पडेल. नवीन व्यावसायिक हालचाली सुरू होतील. मेहनत फळाला येताना दिसेल. मित्रांचा सल्ला उपयोगी पडेल. आत्मविश्वास वाढीस लागेल.

दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)

आहाराची पथ्ये पाळा. खर्चाचा अंदाज घेऊन कार्य करावे. दिवस मध्यम फलदायी. हातातील कलेला वाव द्यावा. कला क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस.

दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)

कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. दिवसाची सुरवात चांगली होईल. बुद्धी कौशल्याने कामे मार्गी लावावीत. मुलांकडून चांगल्या बातम्या मिळतील. प्रेमातील व्यक्तींनी सबुरी दाखवावी.

दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)

घरात वातावरण आनंदी राहील. प्रगतीच्या वाटा चोखाळाव्यात. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरेल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींसाठी दिलासादायक दिवस. खर्च वाढते राहतील.

दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)

कौटुंबिक जबाबदारी वाढेल. बोलण्यातून इतरांवर छाप पाडाल. घाई करू नये. व्यावसायिक निर्णय संयमाने घ्यावेत. येणी वसूल होतील.

दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)

हातातील कामे पूर्ण करावीत. कौतुकाची थाप पाठीवर पडेल. समस्येतून मार्ग निघेल. कामावर अधिक लक्ष केंद्रीत करा. स्त्री सहकार्‍यांची मदत मिळेल.

दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)

मनासारखी गोष्ट घडेल. हवी असलेली वस्तु सापडेल. काही सकारात्मक वार्ता मिळतील. अपेक्षित यशाकडे वाटचाल चालू राहील. स्थावर मालमत्तेतून लाभाची शक्यता.

दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)

आळस झटकून कामाला लागावे. मोठ्या लोकांचा आशीर्वाद घ्यावा. प्रेमातील व्यक्तींना चांगला दिवस. विचार भरकटू देऊ नका. समोरील संधीचे सोने करावे.

दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)

दिवस समाधानाचा जाईल. कटू शब्द टाळा. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. व्यापारातील लाभ शांतता प्रदान करतील. नवनवीन खर्च उद्भवतील.

दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)

दिवस धावपळीत जाईल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना चांगला दिवस. प्रलोभनांना बळी पडू नये. वडीलांची मदत घेऊन कामे होतील. मान, सन्मान वाढेल.

दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)

विद्यार्थ्यांनी अभ्यासाला प्राधान्य द्यावे. एखादी आनंदी बातमी समजेल. मात्र खर्चात वाढ होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. आपले कौशल्य कौतुकास पात्र होईल.

दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)

दिवस मंगलदायी ठरेल. मोठ्या माणसांच्या गाठी पडतील. कुटुंबासाठी धावपळ करावी लागेल. चर्चा करताना संयम बाळगावा. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल.

ज्योतिषी विद्याधर करंदीकर