Numerology Shravan Month prediction 2026 : महाराष्ट्रात पवित्र श्रावण महिना १३ ऑगस्ट २०२६ रोजी सुरू होईल आणि ११ सप्टेंबर २०२६ पर्यंत संपेल, “सूर्यदेव आणि भगवान शिवाच्या आशीर्वादाने ज्यांचा मूलांक ४ आहे त्यांचे भाग्य श्रावण महिन्यात उजळू शकते. हा मूलांक असलेल्या व्यक्तींना यश आणि प्रगतीच्या संधी मिळू शकतात.
वर्ष २०२६ चा मूलांक १ आहे. त्यामुळे हे सूर्याचे वर्ष आहे. सूर्य हा आत्मविश्वास, आदर आणि यशासाठी जबाबदार असलेला ग्रह मानला जातो. श्रावण महिना भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे श्रावण महिन्यात सूर्य आणि भगवान शिवाचा प्रभाव जाणवेल. ज्यांचा मूलांक ४ आहे त्यांच्यासाठी हे एक शुभ ठरण्याची शक्यता आहे.
मूलांक १
ज्यांचा मूलांक १ आहे त्यांच्यावर सूर्याचे अधिपत्य असते. कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्यांचा अंक १ असतो. या वर्षी सूर्य हा त्यांचा अधिपती ग्रह आहे. श्रावण महिना या लोकांसाठी शुभ असेल. श्रावण महिन्यात तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्हाला कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळतील. तुमचा आदर आणि सन्मान वाढेल.
मूलांक ३
कोणत्याही महिन्याच्या ३, १२, २१ आणि ३० तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ३ असतो. मूलांक ३ असलेल्या लोकांचा स्वामी ग्रह गुरु आहे. या लोकांना सूर्य आणि गुरुच्या प्रभावाचा फायदा होईल. विद्यार्थ्यांसाठी हा चांगला काळ असेल. त्यांना त्यांच्या करिअरमध्ये यश मिळेल. प्रलंबित कामे पूर्ण होतील.
मूलांक ५
अंकशास्त्रानुसार, महिन्याच्या ५, १४ किंवा २३ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ५ असतो. त्यांचा अधिपती ग्रह बुध आहे. या व्यक्तींवर बुध आणि सूर्याचा सकारात्मक प्रभाव पडेल. त्यांना व्यवसायात वाढ आणि कार्यक्षेत्रात यश मिळेल.
मूलांक ९
ज्यांचा मूलांक ९ आहे त्यांच्यावर मंगळ ग्रहाचे अधिपत्य असते. प्रत्येक महिन्याच्या ९, १८ आणि २७ तारखेला जन्मलेल्यांचा मूलांक ९ असतो. मंगळाला सूर्याचा मित्र मानले जाते. या व्यक्तींना मंगळ आणि सूर्य या दोन्ही ग्रहांच्या प्रभावाचा फायदा होईल. आत्मविश्वास वाढेल आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळेल.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
