Shravan Month Horoscope 2026 : श्रावण महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांचे गोचर होणार आहे. मंगळ २ ऑगस्ट रोजी मिथुन राशीत, बुध ५ ऑगस्ट रोजी कर्क राशीत आणि २२ ऑगस्ट रोजी बुध सिंह राशीत प्रवेश करेल. सूर्य आधीपासूनच सिंह राशीत स्थित असेल, ज्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होईल. याच महिन्यातील ग्रहांचे हे गोचर १२ पैकी ३ राशींच्या लोकांसाठी फलदायी ठरेल. त्यांना प्रत्येक कार्यात यश आणि आर्थिक लाभ मिळेल. या भाग्यशाली राशी कोणत्या जाणून घेऊ….
कर्क ( Cancer Zodiac Sign)
कर्क राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना अत्यंत शुभ राहील, उत्पन्नात वाढ होण्याची दाट शक्यता आहे, हा काळ गुंतवणुकीसाठी फायदेशीर ठरेल. सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुम्हाला अचानक कुठूनतरी पैसे मिळू शकतात, ज्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल. कर्क राशीच्या लोकांना महादेवांचा आशीर्वाद मिळेल आणि व्यवसायात मोठा नफा होईल. नोकरदार लोकांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते.
कन्या (Virgo Zodiac Sign)
संपूर्ण श्रावण महिन्यात कन्या राशीच्या लोकांना भगवान शिवाचा आशीर्वाद लाभेल. व्यवसायात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ खूप चांगला असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि समाजात तुमचा आदरही वाढेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याची शक्यता आहे.
मकर ( Capricorn Zodiac Sign)
मकर राशीच्या लोकांसाठी श्रावण महिना आनंदाने भरलेला असेल. प्रत्येक कामात तुम्हाला भाग्याची साथ लाभेल. शिवाय नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ असेल. महादेवाच्या आशीर्वादाने, सर्व कामे लवकर आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय पूर्ण होतील. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याची शक्यता आहे. नोकरदार व्यक्तींना कामात प्रगती आणि बढती मिळू शकते. अविवाहित व्यक्तींना त्यांचा इच्छित जीवनसाथी मिळू शकतो.
