एप्रिल महिन्याच्या १ तारखेला सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी अमवास्या संपत असून चैत्र प्रतिपदेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर २ तारखेला साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढीपाडवा आहे. त्यामुळे या शुभ मुहूर्त असलेल्या या सणाची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहात आहे. मात्र काही कारणास्तव हा मुहूर्त हुकला तर कोणत्या तारखेला शुभ कार्य करता येईल जाणून घेऊयात. एप्रिल महिन्यात लग्न, मुंडण, गृहप्रवेश, उपनयन विधी, नामकरण, घर, वाहन किंवा इतर मालमत्ता खरेदी इत्यादी अनेक शुभ मुहूर्त आहेत. जर तुम्हाला एप्रिलमध्ये कोणतेही शुभ कार्य करायचे असेल किंवा कोणतीही विशेष खरेदी करायची असेल तर तुम्ही येथे एप्रिलच्या शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊ शकता. याच्या आधारे तुम्ही खरेदी किंवा शुभ कार्यासाठी एक दिवस निश्चित करू शकता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शुभ विवाह मुहूर्त: एप्रिलमध्ये लग्नासाठी एकूण दहा शुभ मुहूर्त आहेत. तुम्हाला तुमच्या घरी किंवा नातेवाईकाच्या ठिकाणी एप्रिल महिन्यात लग्नाची तारीख निश्चित करायची असेल, तर तुम्ही ती येथे पाहू शकता. विवाहासाठी १५, १६, १७, १९, २०, २१, २२, २४ आणि २७ एप्रिलला शुभ मुहूर्त आहे.

गृह प्रवेश: एप्रिल महिन्यात गुढीपाडव्याचा मुहूर्त सोडला तर नवीन घरात गृहप्रवेश करायचा आहे, त्यांना थोडी वाट पहावी लागेल कारण एप्रिल महिन्यात गृहप्रवेशासाठी मुहूर्त नाही.

खरेदीचा मुहूर्त: जर तुम्हाला एप्रिल महिन्यात नवीन वाहन, घर, फ्लॅट, प्लॉट किंवा इतर कोणतीही मालमत्ता खरेदी करायची असेल तर त्यासाठी एकूण आठ दिवस शुभ आहेत. तुम्ही १,२,६,७,११, १२, २१ आणि २६ एप्रिल रोजी वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

मुंडन मुहूर्त: ज्यांना एप्रिलमध्ये आपल्या मुलांचे मुंडण करायचे आहे, त्यांना फक्त तीन शुभ मुहूर्त मिळत आहे. २०, २५ आणि २६ एप्रिल यापैकी कोणत्याही एका दिवशी तुम्ही तुमच्या मुलाचे मुंडण करून घेऊ शकता.

Grah Transit 2022: एप्रिलमध्ये नऊ ग्रह करणार राशी बदल, ‘या’ राशींसाठी धनलाभाचा योग

नामकरण मुहूर्त: या महिन्यात नामकरणासाठी एकूण ११ शुभ मुहूर्त आहेत. जर तुम्हाला तुमच्या बाळाचे नाव ठेवायचे असेल तर तुम्ही ते १,३,६, १०,११,१५, १९,२०,२१, २४ आणि २८ एप्रिल यापैकी कोणत्याही दिवशी करू शकता. हे दिवस शुभ आहेत.

उपनयन विधी मुहूर्त: उपनयन संस्कारासाठी फक्त चार शुभ मुहूर्त आहेत. जर तुम्हाला तुमच्या मुलाचे उपनयन संस्कार करायचे असतील तर तुम्ही ते ३, ६, ११ आणि २१ एप्रिल या तारखेला करू शकता.

  • ३ एप्रिल, दिवस (रविवार) वेळ सकाळी ०९.०३ ते दुपारी १२.३७ पर्यंत
  • ६ एप्रिल, दिवस (बुधवार) वेळ: सकाळी ०६:०६ ते दुपारी १४:३८ पर्यंत
  • ११ एप्रिल, दिवस (सोमवार) वेळ: सकाळी ०७:१५ ते दुपारी १२:१८
  • २१ एप्रिल, दिवस (गुरुवार) वेळ: सकाळी ०५:५० ते रात्री ११:१३
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubh muhurt in april 2022 know about it rmt
First published on: 30-03-2022 at 11:41 IST