Budh-Shukra Yuti 2026: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत उपस्थित असतात तेव्हा त्यांची युती निर्माण होते. या युतीचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो.

पंचांगानुसार, १४ मे २०२६ पासून ते ०८ जून २०२६ पर्यंत शुक्र मिथुन राशीत राहील. या काळात २९ मे २०२६ रोजी बुध देखील मिथुन राशीत प्रवेश करेल. जो २२ जूनपर्यंत याच राशीत राहील. २९ मे २०२६ पासून बुध आणि शुक्र मिथुन राशीत एकत्र आल्याने ‘लक्ष्मी-नारायण’ राजयोग निर्माण होईल, हा योग ०८ जून २०२६ पर्यंत प्रभावी असेल. याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी खूपच फायदेशीर असेल.

‘लक्ष्मी-नारायण योग’ देणार पदोपदी यश

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी लक्ष्मी-नारायण योग अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत.

तूळ (Tula Rashi)

हा योग तूळ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या लोकांसाठी हा राजयोग खूप शुभ परिणाम देणारा ठरू शकतो, या राशीच्या व्यक्तींना मोठा लाभ देऊ शकते. समाजात पद-प्रतिष्ठा वाढेल. भाग्य अधिक मजबूत होईल आणि लोकांचा विश्वास वाढेल. नातेसंबंधात गोडवा येईल; आर्थिक स्थिती सुधारेल, काहींसाठी नवीन कमाईचे मार्गही खुलतील. एकंदरीत, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना नाव, ओळख आणि प्रतिष्ठा वाढवणारा ठरू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)