Shukra Ast 2026 Positive Impact : वैदिक ज्योतिषमध्ये शुक्रदेव हे प्रेम, नातेसंबंध, सुख-सोई, सौंदर्य, कला आणि धनाचे कारक मानले जातात. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी शुक्रदेवांचा अस्त होणार आहे. सूर्यदेवाच्या अतिशय जवळ असल्यामुळे त्यांची ऊर्जा काहीशी झाकोळली जाऊ शकते, ज्यामुळे काही बाबींमध्ये संयम बाळगून पुन्हा विचार करण्याची गरज भासते. मात्र, शुक्रांचा अस्त होणे ही घटना प्रत्येकासाठीच वाईट परिणाम घेऊन येते, असे नाही. चंद्र राशी आणि पत्रिकेतील ग्रहांच्या स्थितीनुसार काही राशींच्या लोकांना धन आणि नातेसंबंधांमध्ये उत्तम लाभ मिळू शकतात.
१. मेष
तूळ राशीत शुक्रदेवांचा अस्त होणे ही घटना मेष राशीच्या लोकांसाठी कामाच्या बाबतीत सकारात्मक बदल घडवून आणू शकते. तुम्ही अशा मोठ्या व्यक्ती, ग्राहक किंवा संस्थांच्या संपर्कात येऊ शकता, जे तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतील. तुमचे करिअरशी संबंधित अडकलेले कोणतेही काम आता मार्गी लागण्यासारखे आहे. पैशांच्या बाबतीत जुन्या गुंतवणुकीची पडताळणी करण्यासाठी आणि पैशांचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. विनाकारण महागड्या गोष्टींवर खर्च करणे टाळा; पण योग्य संधी हातातून जाऊ देऊ नका. भावनांमध्ये वाहून जाण्यापेक्षा योग्य आणि व्यावहारिक निर्णय घ्या.
२. मिथुन
तुम्हाला संभाषण, संपर्क आणि कला क्षेत्राशी संबंधित कामांमधून मोठा फायदा होऊ शकतो. मीडिया, लेखन, डिझायनिंग, मनोरंजन, जाहिरात आणि व्यापाराशी जोडलेल्या लोकांना जुन्या ओळखींमधून पुन्हा संधी मिळू शकतात. तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ होईल. पूर्वी ज्या गोष्टी निरुपयोगी वाटत होत्या, त्या आता फायदेशीर ठरू शकतात. या काळात शुक्रदेव वक्रीदेखील आहेत, त्यामुळे कोणत्याही जुन्या प्रकल्प किंवा संधीवर पुन्हा विचार केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो.
३. कर्क
तुम्हाला करिअर आणि पैशांच्या बाबतीत अत्यंत चांगले परिणाम पाहायला मिळतील. तुमच्या व्यावसायिक जबाबदाऱ्या वाढू शकतात; पण त्याचबरोबर तुम्हाला मान-सन्मान आणि नवी ओळखही मिळेल. काही लोकांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचे किंवा प्रभावशाली लोकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. पैशांच्या बाबतीत तुम्हाला खर्चावर नियंत्रण आणि रखडलेले पैसे परत मिळविता यावे यासाठी हा चांगला काळ आहे. मोठी जोखीम स्वीकारणे टाळा आणि जी परिस्थिती सध्या आहे, तिला अधिक मजबूत करण्यावर भर द्या.
४. धनु
शुक्रदेवांचा अस्त झाल्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी काळ उत्तम संधी घेऊन येऊ शकतो. तुमचे रखडलेले काम हळूहळू मार्गी लागेल, ज्यासाठी थोडे धीर धरण्याची गरज असेल. कामाच्या क्षेत्रात तुमचा जुना अनुभव खूप कामी येईल. एखादी जुनी ओळख तुमच्यासाठी नवीन प्रस्ताव किंवा सहकार्याचा हात पुढे करू शकते. कोणतेही वचन देण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक वाचा. तुमची जुनी मेहनत आता फळाला येण्याची वेळ आली आहे.
५. कुंभ
तुम्हाला शिक्षण, व्यावसायिक संपर्क आणि दीर्घकालीन योजनांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. तुमच्या करिअरच्या दिशेत असा बदल घडून येईल, ज्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असेल. हा काळ तुमच्यात आर्थिक शिस्त निर्माण करण्यास मदत करील. तात्पुरत्या फायद्यामागे धावण्यापेक्षा तुम्ही काहीतरी स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारे निर्माण करण्यात रस दाखवाल. तुमची ही विचारसरणी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. लोकांशी संपर्क, शिकण्याची वृत्ती आणि दूरगामी योजनांमुळे तुमची प्रगती वेगाने होऊ शकते.
(टीप- वरील बातमी प्राप्त माहितीवर आधारित आहे, लोकसत्ता डॉट.कॉम याची पुष्टी करत नाही.)
