Chandra and Shukra Yuti 2026: ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांच्या राशी परिवर्तनाने शुभ योग आणि राजयोग निर्माण होतात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर चंद्र ग्रहाला माता, मन, भावना, सौम्यता आणि सुंदरतेचा कारक ग्रह म्हणून पाहिले जाते. नवग्रहांपैकी चंद्र आणि शुक्र हे दोन असे ग्रह आहे ज्यांना आकर्षण आणि सुंदरचा ग्रह म्हटले जाते. हे दोन ग्रह जेव्हा एकत्र येतात तेव्हा कलात्मक राजयोग निर्माण करतात. हा योग व्यक्तीला कल्पनाशील आणि रचनात्मक बनवतो. कुंडलीत हा योग असणं अत्यंत भाग्यशाली मानले जाते.
पंचांगानुसार, शुक्र सध्या मीन राशीत विराजमान असून १८ मार्च २०२६ रोजी रात्री चंद्रदेव देखील याच राशीत प्रवेश करतील. ज्यामुळे हा शुभ ‘कलात्मक योग’ निर्माण होईल.
‘कलात्मक योग’ म्हणजे काय?
ज्या वेळी सौंदर्याचा कारक शुक्र आणि मनाचा कारक चंद्र एकत्र येतात, तेव्हा व्यक्तिमत्त्वात आकर्षण, कोमलता आणि अभिव्यक्तीची ताकद वाढते. यालाच ‘कलात्मक योग’ म्हटले जाते. या काळात व्यक्तीच्या रूपात, वागणुकीत आणि संवादशैलीत सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो. सामाजिक प्रतिमा सुधारण्यासही हा काळ पोषक ठरतो.
वृषभ (Vrushabh Rashi)
वृषभ राशीचा स्वामी शुक्र असल्याने ही युती अनुकूल ठरू शकते. उत्पन्नवाढ, गुंतवणुकीतून लाभ किंवा थकीत रक्कम मिळण्याची शक्यता आहे. व्यक्तिमत्त्वात आकर्षकता वाढेल. सामाजिक वर्तुळात मान-सन्मान वाढू शकतो. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. करिअरमध्ये मनासारखे यश मिळेल.
कर्क (Kark Rashi)
चंद्र हा कर्क राशीचा स्वामी आहे. त्यामुळे चंद्र-शुक्र युती कर्क राशीच्या व्यक्तींना मानसिक समाधानासोबत आर्थिक संधी देऊ शकते. प्रवास, शिक्षण किंवा सर्जनशील प्रकल्पांतून लाभ संभवतो. वैयक्तिक नातेसंबंध अधिक दृढ होऊ शकतात. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात प्रचंड वाढ होईल. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल.
मीन (Meen Rashi)
युती मीन राशीतच होत असल्याने या राशीच्या व्यक्तींना थेट लाभ अपेक्षित आहे. व्यक्तिमत्त्वात आत्मविश्वास वाढेल. सौंदर्य, आरोग्य आणि आर्थिक बाबींमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. अचानक धनलाभ किंवा नवीन संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
