Shukra And Chandra Make navpanchamg Yog : २९ ऑक्टोबरच्या रात्री शुक्र व चंद्र यांच्यात नवपंचम योग तयार होणार आहे. चंद्राच्या मिथुन राशीतील प्रवेशाने हा योग तयार होईल. चंद्र रात्री १० वाजून ०७ मिनिटांनी मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि तूळ राशीतील शुक्राबरोबर नवपंचम योग तयार करणार आहे. नवपंचम योग हा ज्योतिषशास्त्रातील शुभ योगांपैकी एक आहे. या योगाच्या निर्मितीमुळे तीन राशींना अत्यंत शुभ परिणाम मिळू शकतात. चला तर या राशींबद्दल अधिक जाणून घेऊयात.
मिथुन
शुक्र-चंद्र नवपंचम योग तुमच्या आयुष्यात धन व मानसिक शांती आणू शकतो. दीर्घकाळापासून अडकलेला निधी परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन गुंतवणुकीमुळे अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. नोकरदार व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि काहींना पदोन्नतीही मिळू शकते. व्यावसायिक एखादा मोठा सौदा निश्चित करू शकतात आणि वैवाहिक जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात.
तूळ
तुमच्या राशीचा स्वामी स्वतः शुक्र ग्रह आहे. त्यामुळे, चंद्राच्या गोचरानंतर चंद्र व शुक्र यांच्यात तयार होणारा नवपंचम योग तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरू शकतात. नशिबाची साथ तुम्हाला मिळू शकते. तुम्ही हाती घेतलेल्या कोणत्याही कार्यात यश मिळाल्यास तुमच्यासाठी नवीन संधींची दारे उघडतील. काही व्यक्तींना उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात. जर तुम्ही कला, माध्यम किंवा सर्जनशील क्षेत्रात असाल, तर तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. व्यक्तींना मालमत्ता किंवा नवीन वाहन खरेदी करण्यात यश मिळू शकते.
धनु
शुक्र व चंद्राचा नवपंचम योग तुमच्यासाठी शुभ ठरू शकतो. तुम्ही व्यवसायात असाल, तर तुम्हाला २९ ऑक्टोबरनंतर अपेक्षित परिणाम दिसू शकतात. तुम्ही काही काळापासून आखत असलेल्या योजनांच्या अंमलबजावणीतही यशस्वी होऊ शकता. शुक्र आणि चंद्राच्या प्रभावामुळे तुम्हाला समाजात आदरही मिळू शकतो. या राशीच्या काही व्यक्तींना इच्छित नोकरी मिळू शकते आणि उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. तणाव दूर होईल, आरोग्यात चांगले बदल घडू शकतात.
