Dwidwadash Yog 2026: द्विदादश योग हा वैदिक ज्योतिषशास्त्रातील एक विशेष योग आहे, जो दोन ग्रहांच्या अद्वितीय आणि असाधारण युतीने तयार होतो. द्रिक पंचांगानुसार, ११ मे २०२६ रोजी सकाळी ०६ वाजून ३६ मिनिटांनी गुरू आणि शुक्र एकमेकांपासून ३० डिग्री अंतरावर असतील ज्यामुळे यांच्या विशेष संयोगाने द्विदादश योग तयार होईल. ज्योतिषशास्त्रानुसार, या योगाचे परिणाम काही विशिष्ट राशींसाठी फायदेशीर ठरू शकतात. चला, त्या भाग्यवान राशींबद्दल जाणून घेऊया.
द्विदादश योग ‘या’ राशींचे नशीब चमकणार
वृषभ (Vrushabh Rashi)
द्विदादश योग वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. या काळात नोकरीत हवे तसे यश मिळवाल. शत्रूंवर विजय मिळवाल.तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल. पद-प्रतिष्ठेत वाढ होईल. जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध अधिक गोड होतील. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. अचानक धनलाभ होईल.
तूळ (Tula Rashi)
द्विदादश योग तूळ राशीसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. कुटुंबीयांसोबत फिरायला जाल.
धनु (Dhanu Rashi)
धनु राशीच्या व्यक्तींसाठी हा द्विदादश योग अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. त्यामुळे अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आकस्मिक धनलाभ होईल. मनातील सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी सहकार्यांकडून मदत मिळेल. या काळात आई-वडील आणि तुमच्या गुरूंचा आर्शीवाद तुमच्या पाठीशी असेल. अचानक धनलाभ होईल. वैवाहिक जीवन सुखमय होईल. आयुष्यात सुख-शांती निर्माण होईल.
मीन (Meen Rashi)
द्विदादश योग मीन राशींच्या व्यक्तींसाठी देखील खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आत्मविश्वासात वाढ होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील.
आयुष्यात सुख-समृद्धी येईल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. समाजात मानसन्मान वाढेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
