scorecardresearch

Premium

१० वर्षांनी कन्या राशीत जुळून आलाय शुभ योग; ‘या’ राशींच्या लोकांना व्यवयायात मिळणार लाभ? मिळू शकतो अपार पैसा

कन्या राशीत दहा वर्षांनंतर शुभ योग घडून आल्याने काही राशींना मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

Shukra And Ketu Conjunction
‘या’ ३ राशी होतील धनवान? (फोटो : लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतात. तर काही ग्रह वक्री आणि मार्गी होतात. कधी कधी काही ग्रहांच्या युतीमुळे काही योगही जुळून येतात. आता भौतिक सुखांचा कारक असलेल्या शुक्र ग्रह कन्या राशीत प्रवेश करणार आहेत, तर केतू आधीपासूनच कन्या राशीत विराजमान आहेत. ज्यामुळे केतू आणि शुक्रदेवाची कन्या राशीत युती होणार आहे. ही युती दहा वर्षांनंतर झाल्याने काही राशींना याचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

मेष राशी

मेष राशीच्या लोकांना शुक्र आणि केतुच्या युतीमुळे जीवनात मोठा फायदा होऊ शकतो. नवी नोकरी अथवा नोकरीमध्ये प्रमोशन या मिळण्याची शक्यता आहे. या काळात पैसे येण्याचे काही नवीन स्त्रोत निर्माण होऊ शकतात. कौटुंबिक वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे. चांगल्या आर्थिक संधी तुमच्या वाट्याला येऊ शकतात. तुमच्या व्यवसायाला गती मिळून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. 

financial subsidy for inter caste marriage couple
आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान मिळेना; जोडप्यांना तीन वर्षांपासून प्रतीक्षा
inspirational story kalpana-saroj
बाराव्या वर्षी लग्न, सासरच्यांकडून छळ; दोन रुपयांपासून कमाईला सुरुवात करणाऱ्या कल्पना सरोज ९०० कोटींच्या मालकीण बनल्या कशा?
ram_mandir
Ayodhya Ram Mandir : अयोध्येत धार्मिक पर्यटन वाढल्याने २ लाख लोकांना रोजगार मिळण्याची शक्यता, दरवर्षी ५ कोटी पर्यटक येणार
shani asta 2024 saturn sets in aquarius negative impact on these zodiac sign in marathi
शनीचा १९ दिवसांनंतर कुंभ राशीत होणार अस्त; ‘या’ राशींना जाणवणार आर्थिक समस्या?

(हे ही वाचा: दिवाळीनंतर ४ दिवसांनी ‘या’ राशी होतील बलाढ्य धनवान? सूर्य राशी परिवर्तन करताच मिळू शकते नशिबाला कलाटणी)

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि केतुच्या युतीमुळे सर्वोत्तम काळ सुरु होऊ शकतो. नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. हाती घेतलेले काम पूर्ण होऊन प्रत्येक कामात यश मिळण्याची शक्यता आहे. रखडलेले काम मार्गी लागून मनाप्रमाणे यश मिळण्याची शक्यता आहे. घरात सुख चैतन्य लाभण्याची शक्यता आहे. वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभण्याची शक्यता आहे. 

कन्या राशी

शुक्र आणि केतुच्या युतीमुळे या राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. नवीन प्रकल्पात यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. तुमच्या कठोर परिश्रमाचे या काळात फळ मिळण्याची शक्यता आहे. या काळात मालमत्ता खरेदी करु शकता.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shukra and ketu conjunction in kanya these three zodiac signs bank balance to raise money marathi astrology pdb

First published on: 16-11-2023 at 11:05 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×