Shukra Asta: ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला धन, ऐश्वर्य, सुख-सुविधा, प्रेम, विवाह आणि भौतिक सुखांचा कारक मानले जाते. शुक्राच्या स्थितीत बदल झाला की त्याचा परिणाम सर्व १२ राशींच्या जीवनावर दिसून येतो. पंचांगानुसार १४ ऑक्टोबर २०२६ रोजी शुक्र तूळ राशीत अस्त होणार आहे. शुक्राच्या या बदलाचा विशेषतः करिअर, आर्थिक स्थिती आणि वैवाहिक जीवनावर महत्त्वाचा प्रभाव पडणार असल्याचे मानले जाते.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र अस्त होण्याचा परिणाम सर्व राशींवर सारखा होत नाही. काही राशींच्या लोकांना या काळात कामात चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो, तर काहींसाठी करिअर आणि आर्थिक बाबतीत चांगल्या संधी निर्माण होऊ शकतात. कन्या, मेष, कर्क आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे.
फ्युचर पंचांगानुसार धन आणि वैभवाचा कारक शुक्र ग्रह १४ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता आपल्या मूळ त्रिकोण राशी असलेल्या तूळ राशीत अस्त होणार आहे. त्यानंतर २८ ऑक्टोबर रोजी शुक्र पुन्हा उदय होईल. म्हणजेच शुक्रदेव सुमारे १४ दिवस अस्त अवस्थेत राहतील. मात्र, काही पंचांगांमध्ये शुक्र १२ ऑक्टोबरलाच अस्त होत असल्याचे सांगितले आहे.
मेष राशी (Aries Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचा हा बदल करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे आणि काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना जुन्या ओळखीमुळे आर्थिक लाभ मिळू शकतो. मात्र, मोठे आर्थिक निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे.
कन्या राशी (Virgo Zodiac)
शुक्राचे अस्त होणे कन्या राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत नवीन संधी घेऊन येऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी किंवा महत्त्वाचा प्रकल्प मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ओळखींचा फायदा होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. मात्र, गुंतवणुकीचे निर्णय घाईत घेणे टाळावे.
कर्क राशी (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी शुक्राचा प्रभाव धन आणि करिअरच्या बाबतीत सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. नोकरीत पदोन्नती किंवा पगारवाढीबाबत चर्चा पुढे जाऊ शकते. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात आणि व्यवसाय वाढवण्याची संधी मिळू शकते. कुटुंबाशी संबंधित एखाद्या महत्त्वाच्या आर्थिक बाबतीतही दिलासा मिळू शकतो. मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी (Aquarius Zodiac)
कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्राचे अस्त होणे करिअर आणि आर्थिक स्थितीच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते आणि कामाच्या निमित्ताने फायदेशीर संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन करारातून फायदा होऊ शकतो. उत्पन्न वाढवण्याचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक राहील.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)
